मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नेहा धुपियानं सांगितलं स्तनपानाचं महत्व; शेअर केलेला Video होतोय व्हायरल

नेहा धुपियानं सांगितलं स्तनपानाचं महत्व; शेअर केलेला Video होतोय व्हायरल

स्तनपानाकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहा,त्याकडे अश्लील दृष्टीनं पाहू नका अशी विनंती ही तिनं केली आहे.

स्तनपानाकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहा,त्याकडे अश्लील दृष्टीनं पाहू नका अशी विनंती ही तिनं केली आहे.

स्तनपानाकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहा,त्याकडे अश्लील दृष्टीनं पाहू नका अशी विनंती ही तिनं केली आहे.

मुंबई 28 एप्रिल:  प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल नेहा धुपिया हिनं नुकताच आपली मुलगी मेहर हिला स्तनपान करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नुकत्याच आई झालेल्या एका सहकारी महिलेनं तिला स्तनपानाचा व्हिडिओ शेअर करण्याची विनंती केली होती. तिच्या समर्थनार्थ नेहानं हा फोटो शेअर केला आहे. स्तनपानाकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहा,त्याकडे अश्लील दृष्टीनं पाहू नका अशी विनंती ही तिनं केली आहे.

तिनं इन्स्टाग्रामवर एक मोनोक्रोम फोटो शेअर केला असून त्यासोबत स्तनपानाचे महत्त्व,त्या वेळच्या आईच्या भावना व्यक्त करणारी एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘नवीनच आई झालेल्या स्त्रीचा प्रवास ती स्त्रीच समजू शकते.आपण सर्वजणयातीलआनंदी बाजू ऐकत,बघत असतो त्याचवेळी ती मात्र आईपणाच्यामोठ्याजबाबदारीच्या ओझ्यानं बावरलेली असते. तिच्या मनात दाटून येणाऱ्या वेगवेगळ्याभावनांचानिचरा होण्याचीदेखीलगरज असते. आई होणं आणि त्यात अध्याहृत असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हे खूप अवघड असतं. त्यातही आमच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात,आमचीचेष्टाकेली जाते आणि सर्वांतवाईटम्हणजे आम्हालाट्रोलकेलं जातं.मीस्वतः या सगळ्या प्रकारातून गेलेली आहे त्यामुळे हे सगळं कितीकठीणअसतं याची मला पूर्ण कल्पना आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

एका महिलेनं स्तनपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर तिला ट्रोल करण्यात आलं. नेहा धुपियानं तिला पाठिंबा देत आपला आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला. ‘आईलातिच्या बाळाला कसे आणि कुठे दुध पाजायचे याचा पूर्ण अधिकार आहे. काळ बदलला तरीही आजही अनेक लोक स्तनपान करणाऱ्या महिलांकडे वाईट नजरेनंच बघतात. अश्लीलताच त्यांच्या नजरेत असते.आम्ही लोकांना लैंगिक मार्गाने स्तनपान देणार्‍या मातांकडे पहात आहोत. फ्रीडम टूफीडसाठीआम्हीसमाजातस्तनपानाकडे सामान्य दृष्टीकोनातून बघितलं जावं यासाठी प्रयत्न करत आहोत. नवीनच माता झालेल्या स्त्रियांबद्दल आणि पालकांबद्दल प्रत्येकानं संवेदनशीलदृष्टीकोन ठेवणं आवश्यक आहे. आम्ही असा दृष्टीकोन बाळगून त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. अतिशय असंवेदनशीलपणे केलेल्या कॉमेंटस आईपणाचा आनंद आणि जबाबदारीचं ओझं अशा संमिश्र भावनिकतेतून जाणाऱ्या आईसाठी किती त्रासदायक असतील याचं भान ठेवणं आवश्यक आहे,’असंही नेहानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, PHOTOS VIRAL