Home /News /entertainment /

OMG! लग्नाच्या वाढदिवसाला नेहा धूपियानं शेअर केला 5 बॉयफ्रेंड्सचा PHOTO

OMG! लग्नाच्या वाढदिवसाला नेहा धूपियानं शेअर केला 5 बॉयफ्रेंड्सचा PHOTO

काही काळापूर्वी नेहा धूपियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यात तिनं वादग्रस्त विधान केलं होतं.

    मुंबई, 11 मे : बॉलिवूडच्या बहुचर्चित क्यूट कपलपैकी एक म्हणजे नेहा धूपिया आणि अंगद बेदी. 10 मे नेहा आणि अंगद यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊनमुळे अर्थातच त्यांना हे सेलिब्रेशन मित्रांसोबत करता आलं नाही. मात्र यावर्षी सुद्धा या दोघांनी शक्य तेवढा हा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न केला. आपल्या बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नेहानं पती अंगदला हटके पद्धतीनं लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिनं तिचं वादग्रस्त विधान पुन्हा एकदा वापरलं. नेहा धूपियानं अंगद बेदीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, लग्नाच्या वाढदिसाच्या शुभेच्छा. सहजीवनाची दोन वर्ष... अंगद माझ्या आयुष्यातलं प्रेम आहे. एक सपोर्ट सिस्टिम आहे आणि सर्वाधिक त्रास देणारा रुममेट आहे. हे मला एकाच व्यक्तीमध्ये पाच बॉयफ्रेंड मिळाल्यासारखं आहे. ही माझी निवड आहे. वयाच्या 50 व्या वर्षीही बोल्डनेसमुळे चर्चेत असते ही अभिनेत्री! नेहानं हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सेम पोस्ट लिहिली आहे. पत्नीची ही प्रेमाची भेट पाहून अंगदनं या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, तुझ्यासाठी नेहमीच खूप खूप प्रेम लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. gallan khat teh kaloollan jaada. याशिवाय नेहाच्या या पोस्टवर सिने इंडस्ट्रीमधील अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नेहाच्या या पोस्टमधील कॅप्शनसाठी तिचे चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत. काही काळापूर्वी नेहा धूपियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यात तिनं, मुलीने किती बॉयफ्रेंड ठेवावे ही तिची स्वतःची निवड आणि निर्णय आहे असं वादग्रस्त विधान केलं होतं. हा व्हायरल व्हिडीओ रोडीज ऑडिशनचा होता. ज्यात तिनं एका कंटेस्टंटला कडक शब्दात सुनावलं होतं. या ऑडिशनमध्ये त्या मुलानं सांगितलं होतं की त्याची गर्लफ्रेंड पाच मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये राहून सर्वांना चीट करत असल्यानं आपण तिच्या कानाखाली मारल्याचं सांगितलं होतं. मात्र नेहा तिच्या विधानामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. कसं आहे बेबो-साराचं नातं? करिना म्हणते; 'तिच्या सोडून जाण्यानं मला...' सलमानसोबत काम करण्यास किंग खानचा नकार, शाहरुखनं सोडला बिग बजेट सिनेमा
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या