मुंबई, 10 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाच्या (Neha Dhupia) घरी काही दिवसापूर्वी नव्या पाहुण्याचे (Good News ) आगमन झाले आहे. नेहाला मुलगा झाला आहे. नेहाचा पती अभिनेता अंगद बेदीने (Angad Bedi) ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. आता नेहाने तिच्या मोलाचा गोड आणि गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच नेहाने भली मोठी पोस्ट करत डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत.
नेहाने इन्स्टावर पोस्ट करत तिच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. या काळात डॉक्टरांनी तिला कशाप्रकारे मदत केली व तिच्या मुलाला या जगात कसे सुरक्षितपणे आणले याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसेच डॉक्टरांसोबतचे व तिच्या मुलासोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेहा दुसऱ्यांदा आई (Mom) झाली आहे. याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे. या फोटोमध्ये तिचा नवरा अंगद तसेच मुलगी मेहेर देखील दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
अंगदने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहा दुसऱ्यांदा आई झाल्याची दिली होती माहिती
अंगदने नेहा दुसऱ्यांदा आई झाल्याची माहिती देत म्हटले होते की, 'सर्वशक्तिमानने आज आम्हाला एका मुलाच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे. नेहा आणि बाळ दोघेही ठीक आहेत. मेहेर नवीन पाहुण्याला 'बेबी' म्हणण्यास तयार आहे#बेडिसबॉय येथे आहे, या प्रवासात नेहाने एकाद्या शूर योद्धा असल्याप्रमाणे धाडस दाखवले त्यासाठी तिचे खूप आभार. आता आपण आपल्या प्रेमाने आमच्या चौघांचा हा प्रवास संस्मरणीय बनवूया. यासोबतच अंगदने हार्ट इमोजी देखील शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
वाचा :ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये Mithun Chakraborty ची सून Madalsa sharma ने वाढवला सोशल मीडियाचा पारा
मेहेरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला
दरम्यान, 40 वर्षीय नेहा धुपियाने 2002 मध्ये मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर 2003 मध्ये तिने 'कयामत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नेहाने 10 मे 2018 रोजी अंगद बेदीशी लग्न केले. नेहा आणि अंगदची पहिली मुलगी मेहेरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला. 18 नोव्हेंबर 2018 रोजी मेहरचा जन्म झाला. नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अखेर काजोलच्या 'हेलिकॉप्टर ईला' सिनेमात दिसली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News