नेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

नेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

आता नेहानं इन्स्ट्रावर आपल्या लेकीचा फोटो शेअर केलाय. आणि तिचं नावही सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : 18 नोव्हेंबरला अभिनेत्री नेहा धुपियानं एका गोड मुलीला जन्म दिला. अंगद-नेहाला बाळ होणार ही बातमी त्यांच्या लग्नापासूनच आहे. आता नेहानं इन्स्ट्रावर आपल्या लेकीचा फोटो शेअर केलाय. आणि तिचं नावही सांगितलंय.

मुलीच्या जन्मानं बेदी आणि धुपिया कुटुंबात आनंद सोहळा सुरू आहे. नेहानं इन्स्ट्राग्रामवर मुलीचा फोटो शेअर केलाय. तिनं लिहिलंय, मेहेर धुपिया बेदीनं सगळ्या जगाला हॅलो म्हटलंय. मुलीचं नाव मेहेर ठेवलंय.

View this post on Instagram

Mehr Dhupia Bedi says hello to the world ... ❤️

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

नेहाच्या शोमध्ये अंगदनं हे मान्य केलं की लग्नाआधी नेहा गरोदर होती. ही गोष्ट जेव्हा त्यानं नेहाच्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा सुरुवातीला ते एकदम शांत झाले. पण नंतर ते नाराजही झाले.

नेहा गरोदर झाल्यानंच त्यांनी घाईनं लग्न केलं, हा अंदाज होताच. नेहा आणि अंगद एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे लक्षात आलं सिनेमांच्या वेळी. तुम्हारी सुलू रिलीज झाल्यानंतर अंगदनं सोशल मीडियावर नेहाचं कौतुक केलं होतं.

नेहानंही टायगर जिंदा है सिनेमाच्या वेळी अंगदचं अभिनयाचं कौतुक केलं होतं. मग एक दिवस बातमी आली, दोघांनी गुरुद्वारात जाऊन लग्न केलं.

अंगद नेहाच्या प्रेमात पडला होता. पण नेहा त्याच्यात अजिबात रस घेत नव्हती. एका मुलाखतीत अंगद म्हणाला होता, ' मी अण्डर 19 क्रिकेट खेळत होतो, तेव्हाच नेहाच्या प्रेमात पडलो होतो. ती जिममध्ये यायची. पण मला तिचं नाव माहीत नव्हतं.'

मग हळूहळू दोघांची ओळख, नंतर मैत्री आणि मग प्रेम अशा गोष्टी घडत गेल्या. सुरुवातीला अंगदला नकार देणारी नेहा आज त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीय.

या कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग

First published: November 20, 2018, 4:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading