Photos : हाॅस्पिटलमधून नेहा धुपियाला मिळाला डिस्चार्ज, लेकीसोबत कॅमेऱ्यात कैद

नेहा, अंगद आणि त्यांची लेक मेहेर हाॅस्पिटलबाहेर कॅमेऱ्यात कैद झाली. नेहा धुपियाला नुकताच डिस्चार्ज मिळाला.

  • Share this:

नेहा धुपिया आणि अंगद बेदीच्या घरी सध्या उत्सवाचं वातावरण आहे. नेहानं गोड परीला जन्म दिलाय. 18 नोव्हेंबरला बाळाचा जन्म झाला.

नेहा-अंगदच्या मुलीचं नाव मेहेर ठेवलंय. आई-बाळाला नुकताच हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी त्यांचे फोटोज कॅमेऱ्यात कैद झाले.

अंगद-नेहाला बाळ होणार ही बातमी त्यांच्या लग्नापासूनच आहे. आता नेहानं इन्स्ट्रावर आपल्या लेकीचा फोटो शेअर केलाय. आणि तिचं नावही सांगितलंय.

नेहाच्या शोमध्ये अंगदनं हे मान्य केलं की लग्नाआधी नेहा गरोदर होती.

ही गोष्ट जेव्हा त्यानं नेहाच्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा सुरुवातीला ते एकदम शांत झाले. पण नंतर ते नाराजही झाले.

नेहा गरोदर झाल्यानंच त्यांनी घाईनं लग्न केलं, हा अंदाज होताच. नेहा आणि अंगद एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे लक्षात आलं सिनेमांच्या वेळी. तुम्हारी सुलू रिलीज झाल्यानंतर अंगदनं सोशल मीडियावर नेहाचं कौतुक केलं होतं.

नेहानंही टायगर जिंदा है सिनेमाच्या वेळी अंगदचं अभिनयाचं कौतुक केलं होतं. मग एक दिवस बातमी आली, दोघांनी गुरुद्वारात जाऊन लग्न केलं.

अंगद नेहाच्या प्रेमात पडला होता. पण नेहा त्याच्यात अजिबात रस घेत नव्हती.

एका मुलाखतीत अंगद म्हणाला होता, ' मी अण्डर 19 क्रिकेट खेळत होतो, तेव्हाच नेहाच्या प्रेमात पडलो होतो. ती जिममध्ये यायची. पण मला तिचं नाव माहीत नव्हतं.'

मग हळूहळू दोघांची ओळख, नंतर मैत्री आणि मग प्रेम अशा गोष्टी घडत गेल्या. सुरुवातीला अंगदला नकार देणारी नेहा आज त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 10:54 AM IST

ताज्या बातम्या