नेहा धुपिया-अंगद बेदी लग्नबंधनात!

नेहा धुपिया-अंगद बेदी लग्नबंधनात!

अभिनेत्री नेही धुपिया आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. शीख पद्धतीनंच हे लग्न झालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : सोनम कपूरच्या ग्रॅण्ड वेडिंगनंतर आता बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकलीये. अभिनेत्री नेही धुपिया आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. शीख पद्धतीनंच हे लग्न झालं.अंगद बेदी हा क्रिकेटर बिषन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नेहा-अंगदच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतायत.

गेल्या काही दिवसांपासून अंगद बेदी आणि नेहामध्ये काही तरी शिजत असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी दोघे एकत्र लँच डेटवर दिसले होते. नेहा-अंगदने आजपर्यंत एकत्र काम केलेले नाही. पण काही कॉमन फ्रेन्ड्सच्या माध्यमातून त्यांची भेट झाल्याचे कळते. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता.

सध्या एमटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘रोडिज एक्स्ट्रिम’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा सूत्रधाराच्या भूमिकेत दिसतेय. याशिवाय तिचा टॉक शो 'नो फिल्टर नेहा' चांगलाच गाजतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 03:11 PM IST

ताज्या बातम्या