विरल भयानीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. माहितीनुसार अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोली यांनी नुकतीच दिग्दर्शक राज मेहताची फिल्म जुग जुग जियोचं शूटिंग सुरू केलं होतं. 'जुग जुग जियो' च्या कास्टचे प्रमुख कलाकार कोरोना संक्रमित झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री कियारा आडवाणी आणि दिग्दर्शक राज मेहतादेखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान याबाबत कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हे वाचा - बॉलिवूडमधील अभिनेता व्हेंटिलेटरवर, CINTAA ने मागितली बिग बी, सलमानची मदत काही दिवसांपूर्वी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर सेटवरील काही व्हिडीओ शेअर केले होत. यामध्ये एक व्हिडीओ असा देखील होता की, त्या कोरोना चाचणी (Neetu Kapoor COVID-19 Test) करत आहेत. यामध्ये स्वॅब टेस्ट घेतली जात आहे. विरल भयानीने (Viral Bhayani) शेअर केलेला नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र त्यावर चाहत्यांच्या अजब प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही लोकांनी नीतू कपूर यांच्या कोरोना टेस्ट करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले. ज्यामुळे नीतू यांनी तो व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवर डिलिट केला.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus