• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रणबीरमुळे घरी आले होते फायर ब्रिगेड; आई नीतूने सांगितला मुलाचा पराक्रम

रणबीरमुळे घरी आले होते फायर ब्रिगेड; आई नीतूने सांगितला मुलाचा पराक्रम

नीतू यांनी त्या अमेरिकेत होत्या त्यावेळी घडलेला एक किस्सा सांगीतला. तेव्हा रणबीर देखील लहानच होता. न्यूयॉर्क (New York) मधील त्यांच्या घरी त्याने चक्क फायर ब्रिगेड (Fire Brigade) बोलावले होते.

 • Share this:
  मुंबई 27 जून : ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor)  नुकत्याच ‘सुपर डान्सर 4’ (Super Dancers 4) या रिॲलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून आल्या होत्या. नितू यांनी कार्यक्रमात धमाल केली. यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत नृत्य तर केलच शिवाय त्यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) काही किस्सेही सांगीतले. नीतू यांनी त्या अमेरिकेत होत्या त्यावेळी घडलेला एक किस्सा सांगीतला. तेव्हा रणबीर देखील लहानच होता. न्यूयॉर्क (New York) मधील त्यांच्या घरी त्याने चक्क फायर ब्रिगेड (Fire Brigade) बोलावले होते.

  'बॉयफ्रेंडच्या भानगडीत नको पडू, अभ्यास कर'; 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली ट्रोल

  त्यांच्या घरी फायर ब्रिगेड अलार्म होता. जो आपत्कालीन परिस्थितीत दाबायचा असतो. पण रणबीरने तो दाबला आणि काही वेळातच फायर ब्रिगेड घरी पोहचले. तर ही गोष्ट त्याने कोणालाही सांगितली नाही फक्त त्याच्या आजीला सांगीतली होती.
  नीतू यांनी कार्यक्रमात रणबीरची फॅन असणाऱ्या एका स्पर्धकाशीही गप्पा मारल्या. अंशिका राजपूतला नंतर रणबीरशी फोनवर बोलण्याचीही संधी मिळाली. फोन वर रणबीर म्हणाला, “मी 100 टक्के परत येईन. पण त्याची तुला नक्की भेटेन. खूप खूप शुभेच्छा.”
  कार्यक्रमात नीतू यांनी रणबीर कतरिनाच्या जग्गा जासूस चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासू (Anurag Basu) आणि काही स्पर्धकांसोबत डान्स ही केला. अनुराग बासू अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि गीता कपूर (Geeta Kapoor) यांच्यासमवेत हा शो जज करतात. नीतू या चित्रपटांत दिसत नसल्या तरीही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नेहमी आपल्या मुलांसोबत त्या फोटो शेअर करत असतात. याशिवाय त्यांची नात म्हणजेच नीतू यांच्या मुलीची रिद्धिमाची मुलगी हिच्यासोबतही फोटो शेअर करत असतात.
  Published by:News Digital
  First published: