मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Neetu Kapoor: 'ऋषी कपूर शिवाय आता कोणत्याच कार्यक्रमांना जाण्याची इच्छा होत नाही; रणबीरची आई झाली भावुक

Neetu Kapoor: 'ऋषी कपूर शिवाय आता कोणत्याच कार्यक्रमांना जाण्याची इच्छा होत नाही; रणबीरची आई झाली भावुक

(Rishi Kapoor) ऋषी कपूर यांच्याशिवाय जीवन जगणं किती अवघड आहे? यात त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं या सगळ्यवार (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी मौन सोडलं आहे.

(Rishi Kapoor) ऋषी कपूर यांच्याशिवाय जीवन जगणं किती अवघड आहे? यात त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं या सगळ्यवार (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी मौन सोडलं आहे.

(Rishi Kapoor) ऋषी कपूर यांच्याशिवाय जीवन जगणं किती अवघड आहे? यात त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं या सगळ्यवार (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी मौन सोडलं आहे.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 18 जून: अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) बॉलिवूडमध्ये एका मोठ्या ब्रेकनंतर म्हणजेच तब्ब्ल नऊ वर्षांनंतर ‘जुग जुग जियो’ चित्रपटातून कमबॅक करणार आहेत. नीतू यांचे पती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor Death) यांच्या निधनांनंतर त्यांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित व्हायच्या मार्गावर आहे. नितु यांना आजही ऋषी कपूर यांची कमी भासते असं त्यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे.

ऋषी कपूर यांच्या जाण्यानं नितु सिंगच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. (Neetu Singh & Rishi Kapoor) नीतू सिंग या सत्तर-ऐंशी दशकातील बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. यादों की बारात, दीवर, अमर अकबर अँथनी, कभी कभी अशा सुपरहिट चित्रपटाच्या त्या भाग होत्या. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांची ऋषी कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी 1980 एकमेकांसोबत सात जन्म राहण्याचं वचन एकमेकांना दिलं. त्यांनी नुकतंच PTI शी बोलताना एका मुलाखतीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. ऋषी कपूर यांच्या जाण्यानंतर त्यांचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलला आहे यावर त्या बोलत होत्या.

त्यांचा 'जुग जुग जियो' (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार असून चाहते त्यांच्या या कमबॅकसाठी उत्सुक आहेत. “मी जुग जुग जियो च्या सेटवर जाताना एक फोटो पोस्ट केला होता की त्यांच्याविना घराबाहेर पडताना तो माझा पहिला दिवस होता. मला माहित आहे ते वरून माझ्याकडे पाहत आहेत मला आशीर्वाद देत आहेत. पण त्यांच्याशिवाय जगणं, ते आजूबाजूला नाहीयेत असं मानून जगणं खूप अवघड गेलं.”

ऋषी कपूर यांच्याशिवाय कॅमेरासमोर जाण्याचा आत्मविश्वास त्या मिळवत आहेत पण त्यांच्याविना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा आत्मविश्वास अजूनही त्यांच्यात नाही असं त्या सांगतात. “मी अजूनही कोणत्याही समारंभांना जाऊ शकत नाही. मला अनेकदा सोहळा, समारंभाला उपस्थित राहण्यासाठी फोन येतात पण मी त्यांच्याशिवाय जाऊ शकत नाही.

नुकताच एका मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात आलेलं तिथे माझ्याहस्ते पुरस्कार देण्यात येणार होता पण मी त्यांच्याशिवाय गेले नाही. मला आजही खूप विचित्र वाटत, दडपण येतं. माझ्यात त्यांच्याविना बाहेर जायचा, सोहळ्यांना उपस्थिती लावण्याचा अजूनही आत्मविश्वास नाही.”

हे ही वाचा- R Madhvan: पांढरी दाढी अन् डोक्यावर अॅल्युमिनियम फॉईल, 18 तासांच्या मेकओव्हर नंतर अभिनेत्याची अशी अवस्था!

वर्क फ्रंटवर सांगायचं तर जुग जुग जियोच्या अनुभव त्यांच्यासाठी सुखद होता असं त्या सांगतात. “एक दिवस करण जोहर आमच्याकडे जेवायला आला असताना मी काम सुरु करावं अशी रणबीरची इच्छा त्याने बोलून दाखवली आणि मी ती धुडकावून लावली. करणने हे बोलणं ऐकलं आणि मला ही स्क्रिप्ट ऑफर केली. मी कल्पना ऐकून काहीशा नाखुशीने होकार दिला पण नंतर संपूर्ण कथा ऐकल्यावर मला ती खूपच आवडली. म्हणून मी या चित्रपटाला होकार दिला.” असं त्या म्हणतात.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Ranbir kapoor