मुलगा रणबीर कपूरच्या गाण्यावर आई नीतूने धरला ताल, 'घागरा'वर ठुमक्यांचा VIDEO एकदा पाहाच
रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) फिल्ममधील घागरा (ghagra) गाण्यात माधुरी दीक्षितने सर्वांना दिवानं केलंच, मात्र रणबीरची आई नीतू कपूरही (neetu kapoor) यात कमी ठरली नाही.
मुंबई, 09 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचं गाणं घागरा प्रत्येकाला ताल धरायला लावेल असंच आहे. आपल्या मुलाच्या या गाण्यावर ताल धरण्यापासून रणबीरची आई नीतू कपूरही (neetu kapoor) स्वतःला रोखू शकली नाही. नीतू कपूरने घागरा (ghagra) गाण्यावर ठुमके लगावले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणबीर कपूरच्या 'ये जवानी हे दीवानी' या फिल्ममधील हे गाणं. या गाण्यात माधुरीने सर्वांनाच दिवानं केलं. याच गाण्यावर रणबीरची आई नीतू कपूर थिरकली आहे. सोशल मीडियावरील मास्टरजी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या राजेंद्र सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये नीतू कपूर घागरा या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करताना दिसून येत आहेत. इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून लोकांना तो खूप आवडत आहे.
ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर कपूर कुटुंब आता सावरू लागलं आहे. नुकतंच रणबीर कपूरची आणि त्याची आई नीतू कपूर राज कपूर यांच्या घराबाहेर दिसले होते. राज कपूर यांच्या घराचं काम चालू असून सायकलवरून रणबीरने तिथं फेरफटका मारला होता.
रणबीर कपूर याच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर आलिया भट ही देखील प्रमुख भूमिकेत आहे. त्याचबरोबर यशराज फिल्मच्या समशेरा या सिनेमात देखील रणबीर कपूर दिसणार आहे. यामध्ये श्रद्धा कपूर त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत असणार आहे.