S M L

सोनमच्या रिसेप्शन पार्टीत रंगला ऋषी कपूर आणि सीमा खानचा वाद

सोनम कपूरच्या लग्नात ऋषी कपूर आणि सोहैल खानची पत्नी सीमा खानचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 16, 2018 09:50 AM IST

सोनमच्या रिसेप्शन पार्टीत रंगला ऋषी कपूर आणि सीमा खानचा वाद

16 मे : सोनम कपूरच्या लग्नात ऋषी कपूर आणि सोहैल खानची पत्नी सीमा खानचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्टीत सलमान नाचगाण्यात एवढा दंग झाला होता की ऋषी यांनी सीमाला त्याला बाजूला घ्यायला सांगितलं. मात्र यावरुनच ऋषी आणि सीमामध्ये वाद झाला.

आता ऋषी यांच्या या वागण्यामुळे सलमानचं कुटुंब त्यांच्यावर नाराज असल्याचं बोलंल जातय. एवढंच नव्हे तर ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग यांनी सलमानच्या कुटुंबाची माफी मागितली असल्याचंही समजतंय. नीतू यांनी मागितलेल्या माफीमुळे सलमानच्या कुटुंबियांचा त्यांच्यावरचा राग कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सीमानेही ऋषी कपूर यांच्या वर्तणूकीविषयी सलमानला कल्पना दिली. ज्यानंतर संपूर्ण पार्टीत सलमान ऋषी कपूर यांची भेट घेण्याचे प्रयत्न करत होता. पण, तोपर्यंत कपूर दाम्पत्य पार्टीतून निघून गेलं होतं. दरम्यान आपल्या पतीच्या या अशा वागण्याषयी कळताच नीतू सिंग यांनी सोहेलची माफी मागितली असं म्हटलं जात आहे. ऋषी कपूर यांच्या अशा वागण्यामुळे सलमानचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 09:50 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close