News18 Lokmat

'आयफा'मध्ये नीरजा ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

'निरजा' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला तर शाहीद कपूरला सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिकेचा अवॉर्ड मिळाला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2017 04:15 PM IST

'आयफा'मध्ये नीरजा ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

16 जुलै: भारतीय सिनेमात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या आयफा अवॉर्डसचा सोहळा शनिवारी न्यूयॉर्कमध्ये दिमाखात पार पडला. या वर्षी 'नीरजा' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला तर  शाहीद कपूरला सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिकेचा अवॉर्ड मिळाला.

या वर्षीच्या आयफाचा अंदाजच हटके होता. यंदा आयफाच्या सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्पही आले होते. पण हे काही खरेखुरे राष्ट्राध्यक्ष नव्हते तर ट्रम्प यांच्या वेषात आलेला भारतीय कॉमेडियन होता. या 'भारतीय ट्रम्प'ने सैफ अली खान आणि करण जोहरशी संवादही साधला. प्रेक्षकांना भरपूर हसवलेही.

त्यानंतर वरूण धवन, आलिया भट, सलमान खान,कृती सेनॉन, कतरिना कैफ, शाहिद कपूर, वरुण धवन आणि सुशांत सिंग राजपुत यांच्या एकापेक्षा एक परफॉर्मन्सेसनी आयफाच्या सोहळ्याला साज चढवला.

आयफाचा या वर्षीचा सोहळा वरूण धवनला अत्यंत स्पेशल ठरला कारण त्याचा परफॉर्मन्स तर हिट झालाच पण त्याचसोबत त्याला आयुष्यातला पहिला आयफा अवॉर्डही मिळाला.ढिश्युमधल्या त्याच्या भूमिकेसाठी त्याला बेस्ट कॉमिक रोलचा आयफा अवॉर्ड देण्यात आला. तसंच उडता पंजाब या सिनेमाने चार आयफा अवार्ड्सवर मोहर लावली.

कोणाकोणाला मिळाले आयफा अॅवाॅर्डस्?

Loading...

स्टाइल आयकॉन ऑफ द इयर-आलिया भट

वुमन ऑफ द इयर-तापसी पन्नू

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-अमित मिश्रा- बुलेया

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर-दा दा दस्से आणि तुलसी कुमार-सोच ना सके.

सर्वोत्कृष्ट लिरीक्स-अमिताभ भट्टाचार्य-चन्ना मेरेया

सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका- वरूण धवन - ढिश्युम

सर्वोत्कृष्ट निगेटिव्ह व्यक्तिरेखा-जिम सारभ -निरजा

सर्वोत्कृष्ट कथा- आयेशा देवित्रे धिल्लोन आणि शकून बत्रा-कपूर अॅण्ड सन्स

सर्वोत्कृष्ट प्रथम पर्दापण (स्त्री)-दिशा पटानी- एम.एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी

सर्वोत्कृष्ट प्रथम पर्दापण (पुरूष)-दिलजीत दोसान्ज्झ-उडता पंजाब

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता-अनुपम खेर- एम.एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री-शबाना आझमी-निरजा

सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिका(पुरूष)- शाहीद कपूर-उडता पंजाब

सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिका(स्त्री)-आलिया भट-उडता पंजाब

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-अनिरूद्ध रॉय चौधरी-पिंक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...