या अभिनेत्रीला वयाच्या 60 व्या वर्षी करायचा आहे शाहरुख-हृतिकसोबत रोमान्स

या अभिनेत्रीला वयाच्या 60 व्या वर्षी करायचा आहे शाहरुख-हृतिकसोबत रोमान्स

एक काळ आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वागण्याने आणि अभिनयाने गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने शाहरुख खान आणि हृतिक रोशन अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. वयाच्या 60 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत नीना गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या भूमिका जरी लहान किंवा सहाय्यक कलाकारांच्या असल्या तरीही त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सध्या तर त्यांच्याकडे एकामागोमाग एक सिनेमाची रांगच लागली आहे. 'बधाई हो', 'पंगा' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सिनेमांनंतर आता नीना गुप्ता यांनी याच अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या नीना गुप्ता यांनी नुकत्याच ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या करिअर बद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझी इच्छा आहे की, बॉलिवूडमध्ये एक वेळ अशीही यावी की मला शाहरुख खान आणि हृतिक रोशनसारख्या अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करता येईल. आपण या अभिनेत्यांना स्वतःहून 20-25 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहतो. मग आता अशीही वेळ यायला हवी ही माझ्यासारख्या अभिनेत्रीला या अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करण्याची संधी मिळेल.

मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’

 

View this post on Instagram

 

Beti se bag liya bada acha laga! At the premier of #ZindagiInShort

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, या सर्व गोष्टींसाठी बराच वेळ जाईल किंवा असंही होऊ शकतं की, असं कधीच होणारही नाही. पण माझी खूप इच्छा आहे की मी हृतिक रोशन आण शाहरुखच्या अपोझिट काम करावं. रणबीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स बद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या मी रणबीरसोबतही काम करू शकते मात्र त्यासाठी आपल्या देशात काही वेळ जावा लागेल.

दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की...

 

View this post on Instagram

 

Trench coat pehen liya, lekin zevar pehene ka shauk na gaya abhi tak 💎 @shriparamanijewels

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांची मुलगी मसाबा गुप्ताचा घटस्फोट आणि सिंगल पॅरेंटिंग बद्दलही दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी कधीच विवाहित पुरुषावर प्रेम करु नका असा सल्ला दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला होता.

मराठी सिनेकलाकारांचं पीएम मोदींच्या पावलावर पाऊल, corona virus मुळे होळी रद्द

First published: March 5, 2020, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading