लग्न न करताच अभिनेत्री झाली आई, आता व्यक्त केली चूक सुधारण्याची इच्छा

लग्न न करताच अभिनेत्री झाली आई, आता व्यक्त केली चूक सुधारण्याची इच्छा

या अभिनेत्रीनं तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातला संघर्षही एका मुलाखतीत उलगडला.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : बॉलिवूडमध्ये संघर्षाचा कथा नेहमीच ऐकायला मिळतात. या ठिकाणी करिअरसाठी संघर्ष ते खासगी नात्यातील संघर्षांपर्यंत अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातला संघर्षही एका मुलाखतीत उलगडला. ही अभिनेत्री एक खंबीर महिला आणि सिंगल मदर म्हणून ओळखली जाते. आज त्यांनी या क्षेत्रात यश संपादन केलं असलं तरीही इथंवरचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या अभिनेत्री आहे नीना गुप्ता. ज्या लग्न न करताच एका मुलीच्या आई झाल्या आणि तिचं पालनपोषण करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

नीना गुप्ता यांनी नुकत्याच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी आपल्या सिंगल मदरच्या संघर्षाबद्दल बोलताना नीना म्हणाल्या, 'मला माझ्या आयुष्यातली एक चूक सुधारायची संधी मिळाली तर मी लग्नाशिवाय आई कधीच होणार नाही. कारण प्रत्येक मुलाला आई-वडील अशा दोघांचीही गरज असते. मी नेहमीच मसाबाशी प्रामाणिकपणे सर्व गोष्टी शेअर केल्या त्यामुळे या सगळ्याचा परिणाम आमच्या नात्यावर कधीच झाला नाही. पण तिलाही खूप संघर्ष करावा लागला.'

नीना गुप्ता 1980च्या काळात वेस्टइंडिजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांच्या या नात्याची सगळीकडे खूप चर्चाही झाली. नीना आणि विवियन यांनी कधीच लग्न केलं नाही मात्र नीना यांनी विवियन यांच्या मुलीला जन्म मात्र दिला. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि तेव्हापासून नीना यांनी सिंगल मदर म्हणून मसाबाला एकट्यानं सांभाळलं. आज मसाबा गुप्ता फॅशन इंडस्ट्रीमधील एक प्रतिष्ठित नाव आहे.

60 वर्षीय नीना गुप्ता सध्या त्यांची सेकंड इनिंग खूप एंजॉय करत आहेत. 2018 मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या बधाई होसाठी त्यांना फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुस्कारही मिळाला. त्या लवकरच कंगना रणौतच्या पंगा सिनेमात दिसणार आहे. सध्या त्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या सिनेमात त्या कंगानाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कबीर खानच्या 83 मध्येही त्या दिसणार आहेत.

Published by: Megha Jethe
First published: January 15, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading