Home /News /entertainment /

'या' फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं का? वयाच्या 63 व्या वर्षीही करतेय अभिनय

'या' फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं का? वयाच्या 63 व्या वर्षीही करतेय अभिनय

मसाबा ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. नुकतंच मसाबानं सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर(Throwback photo) केला आहे.

  मुंबई, 28 जून : आपल्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच वादात असणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (Neena Gupta) नीना गुप्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या पहायला मिळतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या नेहमीच चाहत्यांसोबत संपर्क साधत असतात. नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही देखील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मसाबा ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. नुकतंच मसाबानं सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर(Throwback photo) केला आहे. त्यामुळे माय-लेकी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. मसाबानं इन्स्टाग्रामवर आई नीना गुप्ताचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नीना गुप्ता अजिबात ओळखू येत नाही. मसाबानं शेअर केलेला फोटो तिच्या आईच्या 'उत्सव' चित्रपटातील थ्रोबॅक फोटो आहे. यासोबत मसाबानं एक कॅप्शनही लिहिलं आहे. नीना गुप्ता 1984 , फोटो सौजन्य - जहान कपूर. मला आश्चर्य वाटत होतं की हा फोटो कोणी काढला. हेही वाचा - Hemant Dhome: 'झिम्मा' फेम दिग्दर्शकाचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक! मसाबानं शेअर केलेला फोटो अतिशय जुना असल्यामुळे नीना गुप्ता यांना ओळखणं थोडं कठिण जातय. मात्र या फोटोमध्ये नीना गुप्ताचा अतिशय बोल्ड अंदाज (Neena gupta bold look) पहायला मिळत आहे. जुन्या काळातील हा फोटो आणि नीना गुप्ताचा बोल्ड अंदाज पाहून चाहते मात्र थक्क झाले आहेत. जुन्या काळी नीना गुप्तांचा असणारा बोल्ड अंदाज अद्यापही तसाच कायम आहे. 63 वर्षीय नीना अद्यापही तेवढ्याच बोल्ड आणि सुंदर आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. नीना गुप्तांचा हा फोटो पाहून अनेक सेलिब्रेटींनी फोटोंवर कमेंट केली आहे. हा फोटो अनेकांनी शेअर केला असून फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Masaba (@masabagupta)

  नीना गुप्ता यांनी 1982 मध्ये बाॅलिवूड पदार्पण केलं होतं.  यानंतर त्यांनी 'मंडी', 'रिहाई', 'दृष्टी', 'सूरज का सातवा घोडा' या चित्रपटांमध्ये काम केले. नुकतच त्या पंचायत या वेबसिरीजमध्ये झळकल्या होत्या. त्या आगामी 'उच्छाई' या चित्रपटात दिसणार आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Instagram, Instagram post

  पुढील बातम्या