मुंबई. 21 डिसेंबर- प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता ( neena gupta )ही अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे जी तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत असते. नीना गुप्ता अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. ती गुरुवारी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या क्विझ शो कौन बनेगा करोडपती 13 (KBC 13) मध्ये दिसणार आहे.
KBC 13 मध्ये नीना गुप्ता त्यांचा को-स्टार गजराज रावसोबत दिसणार आहेत. सोनी टीव्ही चॅनलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शोशी संबंधित एक व्हिडिओ प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओ प्रोमोमध्ये, नीना गुप्ता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वतःबद्दलचा एक मनोरंजक किस्सा शेअर करताना दिसत आहेत. व्हिडिओ प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन नीना गुप्ता यांना सांगतात की, नीनाजी आम्ही ऐकले आहे की तुम्ही खूप टेनिस-व्हेनिस खेळला आहात.
वाचा-अभिनेत्रीचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू , हत्या-आत्महत्या याबाबत सस्पेन्स!
यावर नीना गुप्ता यांनी स्वतःबद्दलचा एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, 'सुरुवातीच्या काळात मी आणि गुलजार साहेब खूप टेनिस खेळायचो. ते अंधेरीला खेळायला जात असे आणि तास तासभर खेळत असे. एके दिवशी मी त्यांना म्हटलं की, मलाही टेनिस खेळायला खूप आवडतं. त्यानंतर मात्र ते रोज सकाळी 6 वाजता मला पिकअप करू लागले. मी तर अर्ध्या तासातच थकून जायचे, ते मात्र बराच वेळ आणि खूप चांगलं खेळायचे.
View this post on Instagram
नीना गुप्ता पुढे सांगतात, 'जेव्हा मी थोडं खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा एके दिवशी मी त्यांना सांगितलं की, कोणी बाहेर जात असेल तर मला मार्टिना (मार्टिना हिंगिस) सारखा टेनिस स्कर्ट आणायला सांगाल. तेव्हा ते माझ्यावर खूप चिडले. आधी खेळ शिक, नंतर स्कर्टचा विचार कर, असं म्हणत ते मला ओरडले. नीना गुप्ता यांच्याकडून हे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन आणि KBC 13 मध्ये बसलेले प्रेक्षक हसू लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment, TV serials