वयाच्या 60व्या वर्षी अभिनेत्रीनं घातला शॉर्ट ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

वयाच्या 60व्या वर्षी अभिनेत्रीनं घातला शॉर्ट ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असून इन्स्टाग्रामवर ती बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लॅमर लुक यांचं एक वेगळं नातं असतं. सिनेमात लुकवर जेवढ त्या लक्ष देतात तेवढंच त्यांना बाहेर कुठेही फिरतानाही त्यांच्या लुकवर लक्ष द्यावं लागतं. पण वाढत्या वयात अनेक अभिनेत्री आपल्या ड्रेसिंग सेन्सकडे लक्ष देणं बंद करतात. पण बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जी वयाच्या 60व्या वर्षीही तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. या अभिनेत्रीचं नाव आहे नीना गुप्ता.

बॉलिवूडच्या सध्याच्या अभिनेत्रींनाही लाजवेल असा उत्साह असलेल्या नीना गुप्ता यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला जो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये नीना यलो कलरचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'Frock का shock. गजराज सरांनी काढलेला फोटो.’ नीना यांच्या या लुकवर सर्वच फिदा झाले आहेत. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या असून त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

राणी मुखर्जीला पाहिल्यावर सलमान खानला आठवते ‘ही’ भाजी!

 

View this post on Instagram

 

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

अशाप्रकारे फोटो शेअर करण्याची नीना यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस लुकमधील फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटवर एक पोस्ट करत त्यांना सिनेमात काम देण्याची मागणी केली होती. त्यांची ही ट्विटर पोस्ट खूप व्हायरल सुद्धा झाली होती. तर दुसरीकडे नीना यांचं इन्स्टाग्राम अकाउंट त्यांच्या बोल्ड आणि स्टायलिश लुक्सनी भरलेलं आहे.

प्रियांका चोप्राच्या पतीवर ‘ही’ अभिनेत्री फिदा, व्यक्त केली डेट करण्याची इच्छा

 

View this post on Instagram

 

Missing Goa #flashbackmonday

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीना गुप्ता यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर त्या शेवटच्या बधाई हो सिनेमात दिसल्या होत्या. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं तसेच या सिनेमासाठी त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या आगामी सिनेमांच्या लिस्टमध्ये रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ अश्विनी अय्यरचा ‘पंगा’ आणि हितेशचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सारखे बिग बजेट सिनेमे आहेत.

बॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्री आहेत सैनिकांच्या लेकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 08:13 AM IST

ताज्या बातम्या