मुंबई, 27 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतात. मात्र आता त्यांची लेक मसबा देखील चर्चेत आली आहे. नीना गुप्तांच्या लाडक्या लेकीनं मसाबानं गुपचूप लग्न केलं आहे. बॉयफ्रेंड सत्यदीप बरोबर मसाबानं सात फेरे घेतले आहेत. मसाबानं पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी मसाबानं बॉयफ्रेंडबरोबर लग्न केलं आहे. सत्यदीप आणि मसाबा यांच्या लग्नाचा फोटो देखील समोर आला आहे. नीना गुप्ता यांची मात्र या संबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मसाबा गुप्ता ही नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध 'मसाबा मसाबा' या सीरिजमध्ये दिसली होती. यात मसाबाच्या नवऱ्याची भूमिका साकारणाऱ्या सत्यदीपबरोबरचं तिनं रिअल लाइफमध्ये लग्न केलं आहे. मसाबा मसाबाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. दोघे एकमेकांना डेट करत होते. आज अखेर त्यांनी लग्न केलंय.
आज सकाळी मी माझ्या शांततेच्या महासागराशी लग्न केलं आहे. इथं प्रेम, शांतता, स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी आयुष्य आहे, असं म्हणत मसाबानं लग्नाचे फोटो शेअर केलेत. सत्यदीप मिश्रा आणि मसाबा गुप्ता यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीनं लग्न केलंय. मसाबाला तिचं लग्न साध्या पद्धतीनं करायचं होतं.
View this post on Instagram
मसाबानं स्वत:च्या लग्नाचे आऊटफिट्स स्वत: डिझाइन केले आहेत. मसाबा ही फॅशन डिझाइनर आहे. ब्रँड हाऊस ऑफ मसाबा या तिच्या ब्राइडल कलेक्शनमधील तिच्या लग्नाचे खास आऊटफिट्स तिनं घातले होते. सत्यदीप मिश्रानं पिंक सिल्क शेरवानी तर मसाबानं बर्फी पिंक कलरचा लेहंगा घालता होता. सोबतच गोल्डन ज्वेलरीनं लुकला चार चांद लावले.
मसाबा आणि सत्यदीप या दोघांचाही हे दुसरं लग्न आहे. मसाबाचं पहिलं लग्न हे मधु मंटेनाबरोबर झालं होतं. मधु बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आहे 2015मध्ये दोघांनी लग्न. त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 4 वर्षांनी 2019मध्ये ते वेगळे झाले. तर सत्यदीपचं मसाबाआधी अभिनेत्री अदिती राव हैदरीबरोबर लग्न झालं होतं. 2009मध्ये दोघांचं लग्न झालं 2013पर्यंत टिकलं. सत्यदीप देखील अभिनेता असून त्यानं नो वन किल्ड जेसिका, बॉम्बे वेल्वेट, चिल्लर पार्टी, फोबिया, विक्रम वेधा सारख्या सिनेमात काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News