मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Neena Gupta : 'मी प्रेमात आंधळी...' लग्नाशिवाय आई होण्याच्या 'त्या' निर्णयावर नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

Neena Gupta : 'मी प्रेमात आंधळी...' लग्नाशिवाय आई होण्याच्या 'त्या' निर्णयावर नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

नीना गुप्ता

नीना गुप्ता

नीना गुप्ता या लग्नाशिवाय आई झालेली अभिनेत्री आहे. आता एवढ्या वर्षांनंतर त्यांनी याविषयी मौन सोडलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 23 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये नीना गुप्ता या अभिनेत्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या 'उंचाई' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत नीना गुप्ता यांचा सलग दुसरा चित्रपट आहे. चित्रपटां व्यतिरिक्त, नीना गुप्ता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील कायम चर्चेत असतात. एकेकाळी वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत तिचे अफेअर चर्चेत होते. अर्थात, नीना यांनी विवियनशी लग्न केले नाही, परंतु ती त्यांच्या मुलीची आई मात्र आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर मसाबा ही नीना गुप्ता आणि विवियन यांची मुलगी आहे. नीना गुप्ता या लग्नाशिवाय आई झालेली अभिनेत्री आहे. आता एवढ्या वर्षांनंतर त्यांनी याविषयी मौन सोडलं आहे.

नीना गुप्ता अनेकदा तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात. लग्नाशिवाय मुलाला जन्म देण्याचा तिचा निर्णय अजिबात सोपा नव्हता असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. अलीकडेच नीना जेव्हा लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या तेव्हा नेमकं काय घडलं तो किस्सा त्यांनी सांगितलं आहे. नीना यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे कि, त्यांनी त्यांचा पार्टनर विवियन रिचर्ड्सला प्रेग्नेंसीबद्दल सांगितले.

हेही वाचा - Sajid Khan B’day: एकेकाळी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता साजिद खान; 'या' कारणामुळे तुटलं नातं

याविषयी नीना गुप्ता म्हणाल्या, 'प्रेग्नेंसीबद्दल कळल्यानंतर मी आनंदी  झाले असे नाही. मी आनंदी होते कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं.  मी लगेच विवियनला फोन केला आणि विचारले, 'तुला नको असेल तर मी या मुलाला जन्म देणार नाही'. पण तो म्हणाला, 'या मुलाला जन्म दे, मला आवडेल.' आणि त्यानंतर मसाबाचा जन्म झाला.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, 'प्रत्येकाने मला सांगितले, 'नाही, तू एकटी कशी काय करू शकतेस?' नीना पुढे म्हणाली, 'विवियन आधीच विवाहित होता. मी त्याच्याशी लग्न करून अँटिग्वामध्ये राहायला जाऊ शकले नाही. पण, जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही कोणाचेही ऐकत नाही. कोणतेही मूल त्यांच्या पालकांचे ऐकत नाही. माझ्या बाबतीतही तेच घडलं. नीना गुप्ता यांनी असेही सांगितले की, सुरुवातीला सर्वांनी तिच्या निर्णयाला विरोध केला. मात्र, नंतर वडिलांनी त्याला साथ दिली.

विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या प्रेमकहाणी विषयी सांगायचं तर त्यांची पहिली भेट जयपूरमध्ये झाली  होती. त्यावेळी ती विनोद खन्नासोबत एका चित्रपटासाठी शूटिंग करत होती. जयपूरच्या महाराणींनी चित्रपटाची स्टारकास्ट आणि वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. इथेच नीना आणि विवियन पहिल्यांदा भेटले होते. या दोघांची मुलगी मसाबा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नीना गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'बधाई हो' नंतर ती सतत चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसत आहे. आता त्या लवकरच 'वध' चित्रपटात दिसणार आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment