राष्ट्रीय महिला आयोगाची महेश भट्ट आणि उर्वशी रौतेलाला नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

राष्ट्रीय महिला आयोगाची महेश भट्ट आणि उर्वशी रौतेलाला नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्याबरोबरच अन्य काही जणांना नोटीस पाठवली.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्याबरोबरच अन्य काही जणांना नोटीस पाठवली. लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये एका कंपनीच्या प्रमोटरविरोधात असा आरोप केला आहे की, त्याने मॉडेलिंग करिअर घडवण्याची संधी देण्याच्या बहाण्याने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे आणि त्यांना ब्लॅकमेल केले आहे. याप्रकरणी साक्ष देण्यासाठी महेश भट्ट आणि उर्वशी रौतेला यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'निर्देश जारी करूनही आयएमजी व्हेंचर्सचे प्रमोटर सनी वर्मा आणि त्याच्या साथीदारांनी आयोगासमोर उपस्थिती दर्शवली नाही. या लोकांनी ना कोणते उत्तर दिले आहे ना ही ठरलेल्या बैठकीत ते सहभागी झाले आहेत.'

याप्रकरणी महेश भट्ट, उर्वशी रौतेला, इशा गुप्ता, रणविजय सिंघा, मौनी रॉय, प्रिन्स नरूला यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती रेखा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. योगिता भयाना यांनी केलेल्या तक्रारीबाबत साक्ष नोंदवण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 6, 2020, 7:59 PM IST

ताज्या बातम्या