'सुशांतची मृत्यूनंतरची लोकप्रियता पंतप्रधानांपेक्षाही जास्त' NCP नेत्याच्या वक्तव्यावरून गदारोळ

'सुशांतची मृत्यूनंतरची लोकप्रियता पंतप्रधानांपेक्षाही जास्त' NCP नेत्याच्या वक्तव्यावरून गदारोळ

'सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) जिवंत असाना लोकप्रिय नव्हता तेवढा मृत्यूनंतर फेमस झाला आहे.' असं Tweet करून माजीद मेमन यांनी वाद ओढवून घेतल्यानंतर लगेच NCP ने सारवासारव केली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : 'सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) जिवंत असाना लोकप्रिय नव्हता तेवढा मृत्यूनंतर फेमस झाला आहे. मीडियामध्ये सुशांत आपल्या पंतप्रधान (PM narendra Modi) किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षाही जास्त जागा व्यापतो आहे', या अर्थाचं Tweet राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं आणि सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून एकच गदारोळ उठला आहे.

राष्ट्रवादीचे माजीद मेमन राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांनी सुशांतच्या तपासाविषयीसुद्धा मायक्रोब्लॉगिंग साइट - Twitter वरून प्रतिक्रिया दिली आहे.

एखाद्या गुन्ह्याचा तपास जेव्हा सुरू असतो तेव्हा त्यातली प्रत्येक बाब प्रसिद्ध झाली तर त्यातून महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे यावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे सत्य आणि न्याय यावर परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे तपासाबाबत गुप्तता पाळणं आवश्यक आहे, असं माजिद मेमन म्हणतात.

सुशांतबद्दल असं वक्तव्य केल्यानंतर त्याचे सोशल मीडियावर तातडीने प्रतिसाद उमटले.

काही मिनिटातच राष्ट्रवादीच्या वतीने माजिद यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं.

माजिद मेमन यांनी Twitter वर व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तिक आहे आणि त्याचा पक्षाशी संबंध नाही, असं नवाब मलिक यांनी काही मिनिटातच ट्विटरवरून जाहीर केलं. मेमन हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, असं सांगत नवाब मलिक यांनी तातडीने या प्रकरणावर सारवासारव केली आहे. आमचा पक्ष या कुठल्याही वक्तव्याला पाठिंबा देत नाही, असं त्यांनी Tweet करून लगेचच सांगितलं.

राष्ट्रवादीच्या या पवित्र्यानंतर माजिद मेमन यांनी पुन्हा एक ट्वीट करत आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगत आहेत. आपल्याला सुशांतचा अवमान करायचा नव्हता. माझ्या ट्वीटमधून असा अर्थ काढू नये.

माझ्या ट्वीटमधून कुणाचाही अवमान झालेला नाही, असं मेमन यांनी त्यांच्या ताज्या Tweet मध्ये म्हटलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 12, 2020, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading