मुंबई, 19 जानेवारी: अली अब्बास जफर दिग्दर्शित 'तांडव'मध्ये (Tandav) मध्ये हिंदू देवीदेवतांचा अवमान केल्याचा आरोप देशभरातून केला जात आहे. या सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमधील एका दृश्याला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर वेब सीरीज 'तांडव' गेल्या काही दिवसांपासून याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आहे. काही राज्यांमध्ये या सीरिजविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान ही सीरिज बॅन केली जावी अशी मागणी देखील होत आहे. दरम्यान या सीरिजच्या बॅनबाबत होणाऱ्या मागणीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील याबाबत भूमिका मांडली आहे.
'महाराष्ट्र सरकार हिंदू देवी देवतांचा अपमान सहन करणार नाही. कुणीही हिंदू-देवी देवतांबाबत चुकीचे वागावे अशी आमची अपेक्षा नाही. तसंच या प्रकरणात गृहमंत्री सर्व आरोप पडताळून पाहतील आणि गरज भासल्यास एफआयआर नोंदवला जाईल', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
(हे वाचा-'त्याने जियाला टॉप उतरवायला सांगितला...' Jiah Khan च्या बहिणीचा साजिद खानवर आरोप)
महाराष्ट्रातही विविध ठिकाणी या सीरिजला विरोध दर्शवला जात आहे. सोशल मीडियावर मागणी जोर धरू लागली आहे की ही सीरिज बॅन व्हावी. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनी, या सीरिजमध्ये भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. अभिनेता झिशान अयू ब याला यासाठी माफी मागावी लागेल. तसंच सीरिजचे निर्माता दिग्दर्शक यांनी हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागायला हवी, असंही ते म्हणाले. त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल करीत सीरिजचे निर्माता, निर्देशक आणि अभिनेत्यांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान तांडव वेबसीरिज विरोधात नोएडा पोलिसात देखील एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याठिकाणी पोलीस कमिशनर आलोक सिंह यांच्या आदेशानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तांडव वेब सीरीज रिलीज करणारे OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे ओरिजनल कंटेंट हेड इंडिया अपर्णा पुरोहित, तांडव वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, प्रोड्युसर हिमांशू कृष्णा मेहरा , लेखक गौरव सोलंकी, अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचं नाव या एफआयआरमध्ये आहे.
(हे वाचा-जिया खानच्या बहिणीनंतर शर्लिन चोप्राचेही साजिद खानवर गंभीर आरोप)
दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या, मथुरा आणि काशीसह प्रयागराजमध्ये साधु-संतांसह अनेक संघटनांनी या वेब सीरीजचा विरोध केला आहे. हजरतगंज कोतवालीमध्ये वेब सीरीज 'तांडव' बनवलेल्या आणि रिलीज करणाऱ्यांविरोधात गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.