Home /News /entertainment /

मोठी बातमी! Drug Case मध्ये बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार चौकशी, NCB ने पाठवला समन

मोठी बातमी! Drug Case मध्ये बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार चौकशी, NCB ने पाठवला समन

दिवंगत अभिनेता सुशांतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग कनेक्शन प्रकरणी बॉलिवूडमध्ये तणावाचे वातावरण आहे. प्रत्येक दिवसाला काही मोठी नावं या प्रकरणात समोर येत आहेत.

    मुंबई, 12 नोव्हेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावं समोर येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) कडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी एक महत्त्वाचे अपडटे हाती येत आहे, या ड्रग प्रकरणात आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची देखील चौकशी होणार आहे. एनसीबीनी अर्जुनला समन धाडला आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याला उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन बजावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स (Gabriella Demetriade) हिची देखील चौकशी केली. दरम्यान आता अर्जुनला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार Gabriella आज देखील एनसीबीसमोर हजर झाली होती. बुधवारी गॅब्रिएलाची एकूण 6 तास चौकशी झाली. याच चौकशीचा भाग म्हणून तिची आज देखील चौकशी करण्यात आली. (हे वाचा-एकता कपूर अडचणीत! वेब सीरिजमधून अश्लीलता पसरवल्याचा आरोप, चालणार खटला) सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपाल याच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं NDPS कायद्याअंतर्गत येतात. याप्रकरणी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची चौकशी झाली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील असे बरेच मोठे चेहरे एनसीबीच्या रडारवर आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या