मुंबई, 02 डिसेंबर: ड्रग्ज केसमध्ये कॉमेडियअन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिबांचिया (Harsh Limbachiyaa) या दोघांनाही जामीन मिळाला आहे. पण न्यायालयाच्या या निर्णयावर NCB नाराज आहे. भारतीला मिळालेला जामीन रद्द करावा अशी मागणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे करण्यात आली आहे. याप्रकरणी एनसीबीने कोर्टातही धाव घेतली आहे. त्यामुळे भारतीवर सध्या अटकेची टांगती तलवार कायम आहे. करिअर बद्दल बोलायचं झालं तर तिला ‘द कपिल शर्मा शो’ मधूनही डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती.
21 नोव्हेंबर रोजी भारती सिंहला अटक करण्यात आली होती. NCB च्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यानं ड्रग्स घेतल्याचं कबूल केलं होतं. भारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली होती. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं छापेमारी केली होती. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.
ड्रग केसनंतर भारती ट्रोल
ड्रग केसमध्ये अडकल्यानंतर भारती चांगलीच ट्रोल होत आहे. तिच्या पतीने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता त्यावरुन तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. त्यात त्याने लिहीलं होतं की, ‘आपण एकत्र आहोत त्यामुळे मला कशाचीच भीती नाही.’
भारती सिंह ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे. 2008 साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ अशा अनेक शोमध्ये काम केलं होतं. काही चित्रपटांमध्येही ती झळकली होती.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.