मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

समीर वानखेडेंकडे महागड्या वस्तू कुठून आल्या? क्रांती रेडकरने नवाब मलिकांना दिलं चोख प्रत्युत्तर

समीर वानखेडेंकडे महागड्या वस्तू कुठून आल्या? क्रांती रेडकरने नवाब मलिकांना दिलं चोख प्रत्युत्तर

NCB अधिकारी समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आरोप करणाऱ्या नवाब मालिकांवर (Nawab Malik) वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनं (Kranti Redkar) पुन्हा एकदा घणाघात केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2 नोव्हेंबर- NCB अधिकारी समीर वानखेडेवर  (Sameer Wankhede)  आरोप करणाऱ्या नवाब मालिकांवर (Nawab Malik) वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनं  (Kranti Redkar)  पुन्हा एकदा घणाघात केला आहे. नुकताच मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आपल्या स्पेशल आर्मीसोबत वसुली करत असल्याचं आणि कोट्यवधींचे कपडे घालत असल्याचे आरोप केले होते. त्यांनतर वानखेडे यांच्या पत्नी क्रांतीनं पुन्हा एकदा ट्विटरद्वारे नवाब मालिकांवर निशाणा साधला आहे.

काय आहे क्रांती रेडकरचं ट्विट-

क्रांती रेडकरनं ट्विट करत म्हटलं आहे, 'समीरकडे असलेली सर्व संपत्ती त्याच्या आईकडून मिळालेली आहे. ती ५० किंवा १०० कोटींची नाही.   आणि ती समीरकडे वयाच्या १५ व्या वर्षांपासून आहे. सरकारी नियमांनुसार त्यासंबंधी सर्व कागदपत्रे सादर केली जातात. ती संपत्ती बेकायदेशीर नाही. सोबतच मालिकांना टोला देत क्रांतीनं 'सावन के अंधे को हरियाली दिखती है' असं म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यामध्ये हे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र अजूनही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीत. नवाब मलिक सतत नवनवीन आरोप करत खळबळ माजवत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाब मालिका यांनी समीर वानखेडेंवर खंडणीचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी समीर वानखेडे १० कोटींचे कपडे घालत असल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटलं होतं कि वानखेडे हे, ७० हजाराचा शर्ट आणि ५० लाखांचा घड्याळ घालतात. त्यांच्या बुटाची किंमत २ लाख रुपये असते. तर त्यांनी असं सुद्धा म्हटलं कि,समीर वानखेडे यांच्या कपड्यांची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांच्या किंमतीपेक्ष जास्त असते. त्यांनतर समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरनं हा ट्विस्ट करत निशाणा साधला आहे.

प्रेस कॉन्फरन्स-

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या मार्फत मिळालेलं एक पत्र ट्विट केलं होतं. या पत्राच्या आधारे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं होतं. नवाब मलिक यांनी ट्विटरवर आरोप केले होते, कोर्टात केलेल नाही, मीडिया ट्रायल कशी होई शकते. असं पत्र कुणीही लिहू शकतं, हे सर्व आरोप खोटे आहेत. माझे पती नक्कीच या सर्वांतून बाहेर पडतील. असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Drugs, Nawab malik, NCB