Home /News /entertainment /

'ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही' चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेवर भडकले समीर वानखेडे

'ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही' चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेवर भडकले समीर वानखेडे

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात NCB बारकाईने तपास करत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचं नाव यामध्ये समोर आलं होतं.

    मुंबई,22ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाला(Aryan Khan Drugs Case) दिवसेंदिवस नवं वळण लागत आहे. या प्रकणात नुकताच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Pandey)चौकशी करण्यात आली आहे. यावेळी काही महत्वाचे खुलासेदेखील झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री उशिरा चौकशीसाठी पोहोचल्याने NCB अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात NCB बारकाईने तपास करत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचं नाव यामध्ये समोर आलं होतं. अनन्याने आर्यन खानसोबत ड्रग्स संबंधित व्हॉट्सऍप चॅट केल्याचं NCB अधिकाऱ्यांना आढळलं आहे. त्यामुळे तिच्या घराची झडती घेत तिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. नेमकं काय घडलं- अभिनेत्री अनन्या पांडेची सलग दोन दिवस NCB कडून चौकशी सुरु आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अनन्याला २ वाजता NCB कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र यावेळी अभिनेत्री २ तास उशिरा म्हणजेच ४ वाजता पोहोचली होती. त्यामुळे तिची योग्य तशी चौकशी झाली नव्हती. त्यांनतर NCB सलग दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवारी पुन्हा तिला बोलावून घेतलं होतं. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही अनन्या उशिराच पोहोचली यावेळी तिला ११ ला बोलावण्यात आलं होतं मात्र ती चक्क ३ तास उशिरा म्हणजेच २ वाजता कार्यलयात पोहोचली होती. (हे वाचा:आर्यन खानने अनन्या पांडेकडून केली गांजाची मागणी! अखेर अभिनेत्रीचा ... ) त्यामुळे NCB अधिकारी समीर वानखेडे तिच्यावर प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी अनन्याला चांगलंच धारेवर धरत कडक शब्दात तिची कान उघडणी केली आहे. यावेळी वानखेडे यांनी अनन्याला म्हटलं, 'हे तुमचं शूटिंग नाही. किंवा तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे NCB चं कार्यालय आहे. याठिकाणी दिलेल्या निश्चित वेळीच तुम्हाला यावं लागेल. अधिकाऱ्यांना तुमच्यासाठी वाट बघत बसायला वेळ नाही'. असं म्हणत त्यांनी अभिनेत्रीला सुनावलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी (NCB) ज्या व्हाट्सअॅप चॅट्सचा हवाला देऊन अनन्या पांडे (Ananya Panday) हिची चौकशी करीत आहेत, ते आर्यन खान (Aryan Khan) आणि अनन्या पांडे यांच्यामधील आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये (WhatsApp Chat) आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलत होते.सूत्रांच्या मते त्यांच्यामध्ये पुढील बोलणं झालं आहे, (हे वाचा:NCB च्या रडारवर असलेली Ananya panday याआधीही होती वादात; अशी ... ) आर्यन खान, अनन्या पांडेला विचारतो- If Ganja can be arrange. यावर अनन्या पांडे म्हणते - She will arrange एनसीबीच्या (NCB) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या पांडे (Ananya Panday) सोबत याबाबत गुरुवारी चौकशी करण्यात आली. त्यावेळी अनन्या म्हणाली की, आर्यन खानसोबत ती मस्करी करीत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याशिवायही त्यांच्याजवळ असे अनेक चॅट्स आहेत, ज्यात दोघे विविध ठिकाणी नारकोटिक सब्सटेंस (Narcotic Substances) बद्दल बोलत होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ananya panday, Aryan khan, Drugs, NCB

    पुढील बातम्या