Home /News /entertainment /

रिया चक्रवर्तीचा 10 वर्षांचा तुरुंगवास अटळ? घरात सापडलं तब्बल दीड किलो DRUG

रिया चक्रवर्तीचा 10 वर्षांचा तुरुंगवास अटळ? घरात सापडलं तब्बल दीड किलो DRUG

रिया चक्रवर्तीच्या (rhea chakraborty) जामिनावर मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. मात्र आता तिच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा दावा एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांनी केला आहे, ज्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज (Drugs) अँगलने तपास करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला (Showik Chakraborty) अटक केली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या घरी एनसीबीने छापा टाकला ज्यावेळी तब्बल दीड किलो ड्रग्ज सापडलं आहे. त्यामुळे आता दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एनसीबीने रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शोविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. रिया आणि शोविकच्या घरातून किती ड्रग्ज सापडलं आहे, हे त्यांच्या वकिलांनाही माहिती नाही, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. ड्रग्ज घेतल्याने आणि त्याचा व्यवहार केल्याने रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. रिया आणि शोविकच्या जामीन याचिकेवर 29 सप्टेंबरला त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.  मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याबाबत कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय येण्याआधीच रियाच्या घरात ड्रग्ज सापडले आहे. एनसीबीला मोठा पुरावा सापडला आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. अभिनेत्रींपाठोपाठ अभिनेतेही NCB च्या रडारवर या प्रकरणात दीपिका पादुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan), रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) या बड्या अभिनेत्रींची चौकशी होते आहे. आता बॉलिवूडमधील 3 मोठे अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांची S, D, A अशी अद्याक्षरं या चौकशीदरम्यान समोर आली आहेत. ही अद्याक्षरं म्हणजे शाहरुख खान (Shahrukh Khan), डिनो मोरिया (Dino Morea) आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांची नावं आहेत. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा - ड्रग्ज प्रकरणात शाहरुख, रणबीर आणि अर्जुनही अडकणार? NCB च्या रडारवर बॉलिवूड एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या हाती मोठी माहिती लागली आहे. बॉलिवूडमधील या ड्रग्ज रॅकेटमागे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. तो याआधी सुपरमॉडेल राहिला आहे. अटक केलेल्या बहुतेक ड्रग्ज पेडलर्सनी या अभिनेत्याचं नाव घेतलं आहे. हा अभिनेता ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात असतो आणि इंडस्ट्रीमधील कित्येक लोकांना ड्रग्ज मिळवून देतो. मुंबईत 50 लाखांच्या ड्रग्जसह 2 तस्करांना अटक दरम्यान मुंबईत क्राइम ब्रांचने धडक कारवाई केली आहे. दोन ड्रग्ज तस्करांना गजाआड केलं आह. त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ही 50 लाख एवढी होते. हे वाचा - ड्रग्ज रॅकेटबाबत मोठा खुलासा; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच मास्टरमाइंड या तस्करांचे बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या