'देवों के देव महादेव' मधील अभिनेत्रीला गांजा घेताना रंगेहाथ पकडले, टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ

'देवों के देव महादेव' मधील अभिनेत्रीला गांजा घेताना रंगेहाथ पकडले, टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ

'झमेला' या सिनेमातून प्रीतिकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'संकटमोचक महाबली हनुमान' या मालिकेत तिने देवी शचीची भूमिका साकारली होती.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : बॉलिवूडनंतर आता टीव्ही सीरियल कलाकार (TV Actress ) अंमली पदार्थ विरोधी पथक (NCB) च्या रडारवर आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबी अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला NCB च्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विकत घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे आता बॉलिवूड कलाकारांनंतर टीव्ही सीरियल्समधील दिग्गज कलाकारांनी नाव आता समोर येणार असल्याची चिन्ह आहे.

अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये प्रीतिका चौहानने (Pritika Chauhan) देवीची भूमिका साकारली आहे. प्रीतिकाने 'देवों के देव महादेव' (devon ke dev mahadev) या लोकप्रिय मालिकेमध्येही काम केले आहे. एवढंच नाहीतर प्रीतिकाने सीआयडी आणि सावधान इंडिया सारख्या प्रसिद्ध सीरियलमध्ये देखील काम केले आहे. पण प्रीतिकाला आता NCB म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थ विकत घेताना रंगेहाथ पकडले आहे.

...म्हणून मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर स्टोक्सनं दुमडलं मधलं बोट!

'झमेला' या सिनेमातून प्रीतिकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर  'संकटमोचक महाबली हनुमान' या मालिकेत तिने देवी शचीची भूमिका साकारली होती.  या मालिकेनंतर प्रीतिकाने  स्टार भारत वाहिनीवरील ‘जग जननी मां वैष्णो देवी’ मध्ये भूदेवीचा अभिनय साकारला होता.

प्रीतिका चौहान ही फैसल शेख या अंमली पदार्थ तस्कराकडून 99 ग्राम गांजा घेत होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला याची माहिती मिळाली आणि त्याच वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम वर्सोवा इथं पोहोचली आणि त्यांनी दोघांना अंमली पदार्थासहीत अटक केली.

तर आज याच प्रकरणात दीपक राठोड नावाच्या आणखी एका अंमली पदार्थ तस्काराला NCB ने अटक केली आहे.

कोणतीही टेस्ट नाही, तर कुत्रा वासाद्वारे सांगणार तुम्ही पॉझिटिव्ह आहेत की नाही?

प्रीतिकाच्या अटकेने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि टीव्ही सिरीयलमधील अनेकजण हादरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी कार्यालय बाहेर दिग्गज कलाकारांची चौकशी करता रांग लागणार असंच दिसत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 26, 2020, 3:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या