Home /News /entertainment /

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी पुन्हा ट्वीस्ट, सारा अली खानचा मोठा कबुलीजबाब

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी पुन्हा ट्वीस्ट, सारा अली खानचा मोठा कबुलीजबाब

NCB च्या चौकशीत सारा अली खानने (Sara Ali Khan) केला मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल करत तिने बरीच माहिती दिली आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाने(NCB)जोरदार चौकशी सत्र सुरू केलं आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर आता दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला चौकशीसाठी समन्स धाडण्यात आलं होतं. NCB ने केलेल्या चौकशीत साराने आपण स्वतः ड्रग्ज घेत नाही, असं स्पष्ट केलं पण सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा श्रद्धा कपूर आणि साराच्या चौकशीसाठी NCB इमारतीत होते. त्यांनी सारा अली खानला ड्रग्जसंबंधीच्या चॅटबद्दल अनेक प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान सारा बरीच नर्व्हस दिसत होती. तिच्याविरोधात बोट पार्टीतला एक VIDEO हा मोठा पुरावा मानला जात आहे. शिवाय NCB कडे सुशांत आणि तिच्याबद्दल माहिती देणारे काही हॉटेल मॅनेजरचे जबाब असल्याचंही समजतं. सारा अली खानने NCB च्या चौकशीत 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबून केलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती. सारा आणि सुशांत थायलंडला ट्रिपसाठी गेले होते. तिथे कोह आयलंडवर एका पार्टीत ते सहभागी झाले होते. या पार्टीतला एक video तपासादरम्यान पुढे आला आहे. या पार्टीत ड्रग्ज घेतले गेल्याचा आरोप आहे. शूटिंग दरम्यान सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा, असंही साराने NCB ला सांगितलं आहे. श्रद्धा आणि दीपिकाची चौकशी छिछोरे या चित्रपटात सुशांतबरोबरची सहकलाकार श्रद्धा कपूरचीसुद्धा NCB ने चौकशी केली. 'मी ड्रग्ज घेत नाही', या जबाबावर श्रद्धा ठाम असल्याचं समजतं. छिछोरेच्या यशानंतरच्या पार्टीला श्रद्धा उपस्थित होती. दीपिका पादुकोणची चौकशी NCB ने सुरू केली आहे. चौकशीसाठी आली तेव्हा दीपिका खूपच शांत आणि संयमी दिसत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. NCB ने ज्या whatsapp चॅटच्या आधारावर दीपिकाची चौकशी सुरू केली आहे. ते चॅट्स आपलेच असल्याचं दीपिकाने कबूल केलं आहे. पण ड्रग्ज घेते की नाही याविषयी अद्याप दीपिकाने काय सांगितलं हे समोर आलेलं नाही.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Bollywood, Breaking News

    पुढील बातम्या