सुशांत आणि रियाला ‘ड्रग्ज’चा पुरवठा, पुरावे मिळाल्याच्या दाव्याने खळबळ

सुशांत आणि रियाला ‘ड्रग्ज’चा पुरवठा, पुरावे मिळाल्याच्या दाव्याने खळबळ

Sushant Singh Rajput: यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती.

  • Share this:

मुंबई 26 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि Narcotics Control Bureau, NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.

‘हिंदुस्‍तान टाइम्‍स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ईडीने NCBला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही  अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता NCBही त्या अँगलने तपास करणार आहे.

यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.

पहिले चॅट

हे चॅट रिया आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव तोच इसम आहे, जो ड्रग डीलर असल्याचे म्हटले जात आहे. या चॅटमध्ये असे म्हटले आहे की, 'जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे'. हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवला होता.

दुसरे चॅट

दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवशी बातचीत केली आहे. यामध्ये रियाने गौरवला विचारले आहे की, ' तुझ्याकडे MD आहे का?'. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.

चौथे चॅट

या चॅटमध्ये जया रियाला असे म्हणते की, 'चहा, कॉफी किंवा पाण्यामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला ते पिऊ दे. परिणाम पाहण्यासाठी 30 ते 40 मिनीट थांब'. दोघांमध्ये हे संभाषण 25 नोव्हेंबर 2019 रोजी झाले होते.

पाचवे चॅट

एप्रिल 2020 मधील मिरांडा आणि रियामधील चॅट समोर आले आहे. त्यामध्ये मिरांडाने असे म्हटले आहे की - 'हाय रिया, स्टाफ जवळपास संपला आहे.'

सहावे चॅट

एप्रिलमध्ये पुन्हा एकदा मिरांडाने रियाला असे विचारले आहे की, 'काय आपण हे शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो? पण त्याच्याकडे फक्त Hash आणि bud आहे'. यांना लोअर लेव्हलचे ड्रग मानले जाते.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2020, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading