मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मोठी बातमी! अखेर रिया चक्रवर्तीला NCB ने केली अटक; इतर कलाकारही येणार जाळ्यात?,

मोठी बातमी! अखेर रिया चक्रवर्तीला NCB ने केली अटक; इतर कलाकारही येणार जाळ्यात?,

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant singh rajput case) आज अखेर पहिली मोठी अटक झाली आहे. Rhea Chakraborty आता NCB च्या जाळ्यात अडकली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant singh rajput case) आज अखेर पहिली मोठी अटक झाली आहे. Rhea Chakraborty आता NCB च्या जाळ्यात अडकली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant singh rajput case) आज अखेर पहिली मोठी अटक झाली आहे. Rhea Chakraborty आता NCB च्या जाळ्यात अडकली आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 8 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant singh rajput case) आज अखेर पहिली मोठी अटक झाली आहे. (rhea chakroborty arrest) सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) अनेक तासांच्या चौकशीअंती अटक केली आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असं सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली.

ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चौकशी केली. आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली.  इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे.

लवकर मिळणार नाही जामीन

रिया चक्रवर्तीला न्यायालयात हजर केलं जाणार असून अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27 (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने रियाला NCB कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही, असा हा कायदा सांगतो. त्यामुळे रियाला पुढील काही दिवस NCB कोठडीत आणि नंतर जेलमध्ये काढावे लागणार हे नक्की.

कशी दिली कबुली?

रिया, शोविक, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांची समोरा समोर बसून चौकशी केली असता रियाने अंमली पदार्थ घेतल्याचे आणि खरेदी केल्याचे कबूल केलं. रियाचा भाऊ शोविक आणि रियाचा खास माणूस सॅम्युल मिरांडा यांच्या अटकेमुळे रियाच्या अटकेची ही दाट शक्यता निर्माण झाली होती.  कारण शौविक आणि रिया यांच्या देखील अंमली पदार्थ खरेदी विक्री बाबतीत चॅटिंग झालं होतं.  रियाचे संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या याच्या सोबतच्या चॅटवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रियाला मुख्य आरोपी दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे रियाला अटक होणार हे निश्चित झालं होतं. तिने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिल्याबरोबर तिला अटक झाली. अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा कलम २० ( ब ), कलम २८, कलम २९ आणि कलम २७ ( अ ) या कलमांतर्गत रियाला अटक करण्यात आली आहे.

रियाच्या चौकशीतून काय आलं समोर?

रियाने मान्य केले की, मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये दिपेशकडून ड्रग्स मागवले होते. त्याचबरोबर या प्रकरणात अटकेत असलेल्या मिरांडा आणि रियाची समोरासमोर चौकशी केली. यावेळीही रियाला तू ड्रग्स घेतले का? असे प्रश्न विचारले होते.

सुशांबद्दल मोठा गौप्यस्फोट

रियाने हे ही कबुल केले की, ड्रग्स डिलर बासिद परिहारशी पाच वेळा भेटली होती. त्याची भेट सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झाली होती. सुशांत नैराश्यग्रस्त झाला होता. त्याचा अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यानच सुशांत ड्रग्स घेत होता, अशी माहितीही रियाने दिली.

यावेळी रियाने आणखी एका मोठ्या व्यक्तीच्या उल्लेख केला आहे. पण, NCB या व्यक्तीचे नाव सांगण्यास मनाई केली आहे.

सुशांत हा ड्रग्सच्या आहारी गेला होता. आम्ही जेव्हा युरोप फिरण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सुशांतने ही टूर अर्धवट सोडून दिली होती. कारण, या टूरमध्ये सुशांतला कुठे ड्रग्स मिळत नव्हते, असंही रियाने सांगितले.

सुशांतच्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्या होत होत्या. यावेळी बरेच जण हे ड्रग्स घेत होते. या पार्ट्यांमध्ये छोट्या कलाकारांपासून ते मोठे कलाकारही या पार्टीत येत होते. सर्वच जण ड्रग्स घेत होते, असंही रियाने सांगितलं.

NCB ने केलेल्या चौकशीमध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबाबद्दलही सांगणार आहे. त्यामुळे NCB ने मुंबई पोलीस आणि सीबीआयला विनंती केली आहे की, सुशांतच्या घरातून ताब्यात घेतलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी मागणी केली आहे. यात कुठे CBD ऑइल सारखा पदार्थ कुठे आढळतो का हे NCB ला पाहायचे आहे.

आतापर्यंत काय झालं?

- सुशांत सिंह राजपूतचा 14 जूनला मृत्यू झाला. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं.

- मुंबई पोलिसांनी तपास करून ही आत्महत्याच असल्याचं आणि सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला.

- सुमारे महिन्याभरानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रियाविरोधात केस दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगवेगळी वळणं मिळत गेली.

- बिहार पोलिसांनी काही काळ तपास केला, पण पुढे सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण CBI कडे सोपवलं. सध्या CBI या प्रकरणी तपास करत आहे.

- रिया चक्रवर्तीच्या काही whatsapp चॅटवरून तिचे काही ड्रग डीलरशी संबंध असल्याचं उघड झालं आणि narcotics control विभाग यामध्ये ओढला गेला.

- NCB ने ड्रग्जच्या अँगलने वेगळा तपास सुरू केला आणि अनेक ड्रग तस्करांना अटक केली. गोव्यातूनही काही जणांना चौकशीसाठी बोलावलं.

- NCB च्या तपासात सॅम्युएल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्ज विकत घेत असल्याचं समोर आलं आणि दोघांनाही अटक झाली.

- त्यानंतर रिया चक्रवर्तीची कसून चौकशी झाली. आपण ड्रग्ज घेत नसल्याचं सांगणाऱ्या रियाने अखेर मंगळवाली कबुली दिली आणि तिला अटक झाली.

First published:

Tags: Sushant Singh Rajput