मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /SSR Death Case Breaking: सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या काही दिवस आधी मोठी अपडेट, NCB ने जवळच्या मित्राला केली अटक

SSR Death Case Breaking: सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या काही दिवस आधी मोठी अपडेट, NCB ने जवळच्या मित्राला केली अटक

Sushant Singh Rajput Death Case: या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 मे: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यूला पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. गेल्यावर्षी या घटनेने संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं. देशातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. या घटनेचा तपास सध्या एनसीबीकडे (Narcotics Control Bureau) आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

एनसीबीने सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested)  या सुशांतच्या मित्राला अटक केली आहे. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची (NCB Arrested Siddharth Pithani in Sushant Singh Rajput Case) कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे.

हे वाचा-'मोठ्या त्रासातून अधिक ताकद..' सुशांतच्या Death Anniversary आधीच रियाची पोस्ट

सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादहून अटक केली आणि त्याला मुंबईला ट्रान्झिट रिमांडवर  आणण्यात आले आहे. त्याच्या रिमांडसाठी आज त्याला मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम 27, 28 आणि 29 अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case