Home /News /entertainment /

ड्रग कनेक्शनप्रकरणी प्रसिद्ध निर्मात्याच्या पत्नीला अटक; घरातून गांजाचा साठा केला जप्त

ड्रग कनेक्शनप्रकरणी प्रसिद्ध निर्मात्याच्या पत्नीला अटक; घरातून गांजाचा साठा केला जप्त

ड्रग कनेक्शनमध्ये निर्माते फिरोज नाडियाडवाला (Film Producer Firoz Nadiadwala) यांच्या पत्नीलाही एनसीबी (NCB)ने अटक केली आहे.

    मुंबई, 08 नोव्हेंबर: बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची पाळंमुळं अतिशय खोलवर रुजली आहेत, असंच NCB तपासामध्ये दिसून येत आहे. ड्रग कनेक्शनमध्ये निर्माते फिरोज नाडियाडवाला (Film Producer Firoz Nadiadwala) यांच्या पत्नीलाही एनसीबीने अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ड्रग्जशी संबंधित असल्याप्रकरणी अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या निधनानंतर बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आलं आहे. मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातही रविवारी छापेमारी करण्यात आली आहे. एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरी छापे मारले . शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईमध्ये 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. नाडियाडवाला यांचा फोनही एनसीबीने जप्त केला आहे. एनसीबीने छापा मारला तेव्हा नाडियाडवाला घरात नव्हते अशी माहिती मिळत आहे. ड्रग्जच्या कारवाईमध्ये एनसीबी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली आहे. एनसीबीच्या एका टीमने मुंबईतून इस्माइल शेख या ड्रग पेडलरला अटक केली आहे. त्याच्यासह अन्य 4 जणांनाही एनसीबीने अटक केली आहे. या 5 जणांकडे ड्रग्जचा मोठा साठाही सापडला आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh), सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावं ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर आता निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी एनसीबीच्या रडारवर आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या