मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहताच नेटकऱ्यांनी दिली ही रिऍक्शन; म्हणाले 'याचं तर लग्नच...'

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहताच नेटकऱ्यांनी दिली ही रिऍक्शन; म्हणाले 'याचं तर लग्नच...'

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीनच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेता स्वतः देखील आपल्या कुटुंबाला ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर ठेवतो. पण अलीकडेच तो त्याच्या मुलीसोबत एअरपोर्ट वर दिसला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 डिसेंबर : आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झालेल्या बॉलीवूड कलाकारांच्या यादीत नवाजुद्दीन सिद्दीकीचं  नाव कदाचित सर्वात वरती आहे.  या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेकानेक अप्रतिम चित्रपट केले आहेत, ज्यांना प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले आहे. सरफरोशमधील छोट्या भूमिकेतून सुरुवात करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीने गँग्स ऑफ वासेपूरमधून स्वत:ची ओळख निर्माण केली. नवाजुद्दीनच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेता स्वतः देखील आपल्या कुटुंबाला ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर ठेवतो. पण अलीकडेच तो त्याच्या मुलीसोबत एअरपोर्ट वर दिसला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकतंच नवाजुद्दीन त्याच्या मुलीसोबत एअरपोर्ट असताना कॅमेरात कैद झाला. हा व्हिडीओ विरल बयानी यांनी पोस्ट केला आहे. यात अभिनेता मुलीला सोबत घेऊन चालताना दिसतोय. पण त्याची मुलगी पाहून चाहत्यांना विश्वासच बसला नाही. त्यांनी अनेक प्रतिक्रिया या पोस्टवर केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, ''यांचं तर लग्नच झालं नाही ना' तर दुसऱ्याने म्हटलंय 'हाच खरा अभिनेता', 'किती छान आहे त्याची मुलगी' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा - वैभव मांगले नंतर आता छोट्या पडद्यावर हा अभिनेता साकारणार स्त्री पात्र; फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक म्हणाले...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला खूप पसंती दिली जात आहे. या अभिनेत्याच्या साधेपणाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

दरम्यान नुकतंच नवाजुद्दीनने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून त्याची मुलगी शोरा हिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये शोराच्या बालपणीची काही सुंदर झलक पाहायला मिळतात. यामध्ये आपण शोराला विमानात, फटाके फोडताना, अभिनय करताना, केकसह गोंडस अभिव्यक्ती देताना पाहू शकतो. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी शोरा तिचे वडील नवाजुद्दीनच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शोराची निरागसता चाहत्यांची मनं जिंकत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, त्याने 2009 मध्ये आलिया सिद्दीकीशी लग्न केले. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांची मुलगी शोरा हिचे स्वागत केले. नवाजुद्दीन सिद्दीकी एका आलिशान पांढऱ्या पॅलेसमध्ये राहतो, अभिनेताने स्वतः त्याच्या बंगल्याचे इंटीरियर डिझाइन केले आहे. फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नवाजुद्दीन लवकरच 'हड्डी'मध्ये दिसणार आहे. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'टिकू वेड्स शेरू' आणि 'बोले चुडियाँ' या चित्रपटात देखील दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment