मुंबई, 20 मे : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नी त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानं सोशल मीडियावर नवाझुद्दीनच्या नावाची चर्चा होत आहे. नवाझुद्दीन आणि त्यांची पत्नी आलिया यांच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली आहेत. या दोघांना 2 मुलं सुद्धा आहेत. पण अचानक लॉकडाऊनमुळे अलियानं नवाझुद्दीनला कायदेशीर नोटीस पाठवत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता तिनं नवाझुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा केले आहेत.
घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर आलियानं बॉलिवूड लाइफ या वेबसाइडला दिलेल्या मुलाखतीत सिद्दीकी कुटुंबीयांवर शारीरिक आणि मानसिक शोषणाचे आरोप केले आहेत. आलिया म्हणाली, लग्नानंतर वर्षभरातच मला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. मात्र मी याबाबत कोणाकडे अवाक्षरही काढलं नाही. मी सहन करत राहिले. नावझुद्दीनच्या भावानं माझ्यावर हातही उचलला. नवाझुद्दीनच्या पहिली पत्नीही त्याच्या कारणानं त्याच्यापासून वेगळी झाली असंही आलियानं या मुलाखतीत स्पष्ट केलं.
मसाबा गुप्ता पुन्हा प्रेमात! या अभिनेत्रीच्या Ex Husband ला करतेय डेट
आलिया पुढे म्हणाली, मी कधीच काहीच करू शकत नाही अशी जाणीव मला ते लोक रोज करुन देत असत. नवाझुद्दीनं मला कधीच इतर लोकांसमोर बोलू दिलं नाही. त्याने माझ्यावर कधी हात उचलला नाही मात्र त्याचं सतत वाद घालणं आणि मला ओरडणं, घालून-पाडून बोलणं या सगळ्याला आता मी वैतागले आहे. त्याच्या कुटुंबानंही माझं मानसिक आणि शारीरिक आणि मानसिक शोषण केलं. मागच्या अनेक वर्षांपासून मी हे सर्व सहन करत राहिले. लग्नाच्या नात्यात गरजेचा असलेला सन्मान मला नवाझुद्दीकडून कधीच मिळाला नाही. त्याच्या घरात याआधीच 4 घटस्फोट झालेले आहेत हा पाचवा घटस्फोट असेल आणि हे सर्व त्यांच्या लाइफचा भाग झालेलं आहे.
लॉकडाऊनमध्ये सुश्मिता सेननं सांगितली तिची 'लव्ह स्टोरी', पाहा VIDEO
घटस्फोटानंतर आपल्या दोन्ही मुलांची कस्टडी आपल्याकडेच असावी अशी मागणी आलियानं केली आहे. ती म्हणाली, नावझुद्दीन अनेक महिने मुलांना भेटयला येत नाही. त्यांना वडील म्हणून वेळ देत नाही. एवढा मोठा स्टार असून काय उपयोग जर तुम्ही एक चांगली व्यक्ती होऊ शकत नाही. माझ्या मुलांना तर हे सुद्धा आठवत नाही की ते दोघं आपल्या वडीलांना शेवटचं कधी भेटले होते. या सगळ्याचा वडील म्हणून त्याला काहीच फरक पडत नाही आणि त्याच्या वागण्याची आता मुलांनाही सवय झाली आहे त्यामुळे माझी मुलं माझ्याकडेच राहावीत असं मला वाटतं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर नावझुद्दीननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराट