नवाजच्या पोस्टमधून बहिणीचा संघर्ष सोशल मीडियावर शेअर

नवाजच्या पोस्टमधून बहिणीचा संघर्ष सोशल मीडियावर शेअर

नवाजुद्दीन सिद्दीकीने बहिणीच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर फोटो केला शेअर. आणि सांगितली तिच्या जीवनातील संघर्षाची कहाणी.

  • Share this:

मुंबई, 14 आॅक्टोबर : फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी वेळात आपली छबी निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या कामामुळे नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या वैयक्तिक जीवनावर चर्चा केली जाते, तर कधी त्यानं साकारलेल्या भूमिकांवर चर्चा केली जाते. यावेळेस तो सोशल मीडियातील एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

नवाज सोशल मीडियावर बराच वेळा अॅक्टिव्ह दिसून येतो. जास्त प्रमाणात तो चित्रपटाच्या प्रमोशनविषयी पोस्ट करतो. परंतु यावेळेस त्याने त्याच्या बहिणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नवाज भावुक झालेला दिसला. कारण नवाजच्या बहिणीला कॅन्सर असल्याचं पोस्टमध्ये नमुद केलं आहे.

‘माझ्या बहिणीला वयाच्या 18 वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्यावर तिचे उपचार सुरू असून ती आजाराला सामोरे जात आहे. हे सर्व तिच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि धाडसामुळे शक्य झालंय. तिला 25 वर्षे पूर्ण झाली. तरी ती कॅन्सरशी लढत आहे. यातून तिचा जगण्याचा आत्मविश्वास दिसून येतो’ त्याचबरोबर तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल नवाजनं तिचे डॉक्टर आनंद कोप्पिकर आणि ललेश बुशारी यांचे आभारसुद्धा मानले.

आपल्या बहिणीला 25व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन नवाजनं तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीने आतापर्यंत केलेल्या भूमिका खलनायकाच्या असल्या तरी खासगी जीवनात तो अधिक संवेदनशील आहे. नवाजनं केलेल्या या पोस्टमुळे त्याची आणखी एक हळवी बाजू समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. आणि त्या दोघांनी या आजाराचा सामना कशा प्रकारे केला हे त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. याबाबत ताहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

VIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले

First published: October 14, 2018, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading