Home /News /entertainment /

'त्यांनी मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला...' नवाझुद्दीनच्या भावावर पुतणीनं लावले गंभीर आरोप

'त्यांनी मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला...' नवाझुद्दीनच्या भावावर पुतणीनं लावले गंभीर आरोप

माझं लैंगिक शोषण झालं पण मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला समजलं की माझ्यासोबत अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या.

    मुंबई, 3 जून : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबासमोर दिवसागणिक समस्या वाढतानाच दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी आलियानं त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवून धक्का दिलाच होता की आता त्याच्या पुतणीनं त्याच्या भावावर विनभंगाचा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर तिनं दिल्लीच्या जामिया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा ती 9 वर्षांची होती. या वृत्तानंतर नवाझुद्दी आणि त्याच्या कुटुंबाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ई-टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीनं सांगितलं, हे सर्व खूप वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडलं आहे. त्यावेळी मी 9 वर्षांची होते. माझ्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला होता. बाबांनी दुसरं लग्न केलं आणि मी माझ्या सावत्र आईसोबत राहायला लागले. त्यावेळी मी एक लहान मुलगी होते आणि मला कोणत्याही गोष्टीची समज नव्हती. माझं लैंगिक शोषण झालं पण मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला समजलं की माझ्यासोबत अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या. प्रत्येक स्पर्श चुकीचा होता. मला माझा काका नवाझुद्दीनकडून अपेक्षा होती की ते समजून घेतील मात्र असं झालं नाही. अनलॉक होताच सलमान-जॅकलीननं सर्वात आधी केलं हे काम, व्हायरल झाला VIDEO नवाझुद्दीनच्या पुतणीनं सांगितलं की, मी कोर्ट मॅरेज केलं आहे. माझ्या लग्नानंतर त्यांनी मला आणि माझ्या सासरच्या लोकांना खूप त्रास दिला आहे. यात माझे बाबा आणि मोठे बाबा(नवाझुद्दीन)यांचाही समावेश आहे. त्यांनी माझ्या सासरच्या लोकांवर खोट्या केस दाखल केल्या. त्यांनी त्यावेळी असं केलं नसतं तर माझं आयुष्य चांगलं असतं. त्यावेळी माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. आता प्रत्येक 6 महिन्यांनंतर माझे वडील केस फाइल करतात. पण मला विश्वास आहे की आता माझ्या या केसनंतर ते हे सर्व करणं बंद करतील. या सर्व गोष्टींमध्ये मला माझ्या पतीचा खूप सपोर्ट मिळाला. माझ्यासोबत माहेरच्या व्यक्तींकडून शारिरीक हिंसा झाल्याचे पुरावे आहेत. बर्थडेआधी आर्चीनं शेअर केला HOT फोटो, तिचा नवा लुक पाहिलात का?
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या