कानपूर, ११ एप्रिल- बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेत्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. पण त्याच्यासंदर्भातील एक वाईट बातमी समोर आली आहे. नुकताच नवाज एका कार्यक्रमासाठी कानपुरला गेला होता. कानपुरात त्याचं स्वागत अगदी राजेशाही थाटात झालं. पण दरम्यान असं काही झालं की कोणी विचारही करू शकत नाही.
नवाजुद्दीनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कानपूरमधील एका कार्यक्रमादरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, नवाज कार्यक्रम संपल्यानंतर जसा बाहेर पडला त्याला चाहत्यांनी घेरल आणि प्रत्येकाला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा होता. तेव्हाच एका चाहत्याने नवाजचा गळा पकडून त्याला स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला.
नवाजसोबत होत असलेली जबरदस्ती पाहून सिक्युरिटी गार्ड लगेच तिथे आले. मात्र तोपर्यंत त्या ओढाताणमध्ये नवाजुद्दीच्या हाताला दुखापत झाली आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला.या घटनेबद्दल एका वेबसाइटने नवाजला विचारले असता तो म्हणाला की, ‘चाहत्याने असा काही माझा हात ओढला की हाताचे मसल्स ताणले गेले आणि हात फ्रॅक्चर झाला. पण ठीक आहे. त्याची अशी एक पद्धत होती. हे खरं तर त्यांचं प्रेम आहे.’
ठाकरे सिनेमाने नवाजने 2019 ची दणक्यात सुरुवात केली. तर काही दिवसांपूर्वी सान्या मल्होत्रा सोबतचा फोटोग्राफ सिनेमा प्रदर्शित झाला. समिक्षकांनी या सिनेमाचं फार कौतुक केलं होतं. लवकरच तो सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.
या सीझनबद्दल बोलताना नवाज म्हणाला की, पहिल्या सीझनपेक्षा आताचा सीझन हा थक्क करून टाकणारा असणार आहे. जरी तुम्ही गणेश गायतोंडेला ओळखत असाल तरी तुम्हाला कळणार नाही की त्याची भूमिका येत्या सीझनमध्ये कशी असणार आहे. आम्ही या सीझनचं शूटिंग मोबासा केपटाउन आणि जोहान्सबर्ग इथे जाऊन केली.
VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोनिया गांधींनी केलं होमहवन