मुंबई, 27 मार्च: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नीने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले पण नवाजुद्दीनने ते सगळे आरोप फेटाळून लावले. आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचा भाऊ शमसुद्दीन आणि माजी पत्नी अंजना पांडे उर्फ आलिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. नवाजुद्दीनने त्यांनी केलेल्या चुकीच्या दाव्यांमुळे बदनामी आणि छळ केल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. नवाजच्या वतीने वकील सुनील कुमार यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर आता ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
दाखल केलेल्या याचिकेनुसार, नवाजुद्दीनने न्यायालयाला विनंती केली आहे की, त्याचा भाऊ आणि त्याच्या माजी पत्नीने सोशल मीडियावर त्याचे नाव बदनाम करणाऱ्या पोस्ट शेअर करू नयेत आणि सोशल मीडियावर त्याच्यावर लावलेले आरोप मागे घ्यावेत. एवढेच नाही तर दोघांनीही त्याची लेखी माफी मागावी असे नवाजुद्दीनचे म्हणणे आहे.
100 कोटींच्या मानहानीच्या खटल्यासोबतच नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि माजी पत्नीवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी भाई यांच्यावर पैशांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्याने माजी पत्नी आलियावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोपही केला आहे. दाखल केलेल्या याचिकेनुसार, 2008 मध्ये नवाजने त्याच्या भावावर विश्वास ठेवला आणि त्याच्या पैशांशी संबंधित सर्व काम त्याच्याकडे सोपवले, कारण त्याच्या भावाकडे कोणतीही नोकरी नव्हती.
2008 मध्ये जेव्हा त्याचा भाऊ शमसुद्दीनने त्याला सांगितले की तो बेरोजगार आहे, तेव्हा सिद्दीकीने त्याला पाठिंबा दिला. जेणेकरून अभिनेता त्याच्या अभिनयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल. सिद्दीकीच्या दाव्यात म्हटले आहे की त्याने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, स्वाक्षरी केलेले चेक बुक, बँक पासवर्ड, ईमेल पत्ते आणि सर्वकाही त्याच्या भावाला दिले. मात्र, त्याच्या भावाने त्याची फसवणूक केली. कामात व्यस्त असल्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देऊ शकलो नाही, असे नवाजचे म्हणणे आहे.
शमसुद्दीनने एकदा फसवणूक करून प्रॉपर्टीही स्वतःच्या नावावर केली होती. त्याचप्रमाणे भावाने यारी रोडवर एक फ्लॅट, सेमी कमर्शियल प्रॉपर्टी, दुबईमध्ये प्रॉपर्टी आणि बुधना शहापूर इथं फार्महाऊस खरेदी केलं. याशिवाय त्याने १४ महागडी वाहनंही फेरफार करून घेतली होती. याबद्दल अभिनेत्याने त्याला विचारलं असता त्याने आलियाला भडकवलं.असा दावा नवाजुद्दीनने केला आहे.
नवाजनेही आलियावर गंभीर आणि मोठा आरोप केला आहे. नवाजने त्याची पत्नी आलिया म्हणजेच अंजना आधीच विवाहित होती, परंतु तिने हे आपल्यापासून लपवून ठेवलं होतं. असा दावा आरोप केला आहे त्याने भाऊ आणि पत्नीवर 21 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याचिकेत म्हटले आहे की 2020 मध्ये जेव्हा नवाजचे त्याच्या भावासोबतचे संबंध बिघडले तेव्हा त्याने चार्टर्ड अकाउंटंटची नियुक्ती केली आणि नंतर कळले की त्याच्याकडे विविध विभागांचे 37 कोटी रुपये आहेत, जे त्याच्या भावाने भरले नाहीत. आता हे सगळं प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार ते पाहणं महत्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment