नवाझ-अथियाला पायरसीचा फटका, 'या' वेबसाइटवर 'मोतीचूर-चकनाचूर' झाला लीक

नवाझ-अथियाला पायरसीचा फटका, 'या' वेबसाइटवर 'मोतीचूर-चकनाचूर' झाला लीक

नवाझुद्दीन आणि अथिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी यांचा मोतीचूर चकनाचूर हा सिनेमा हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. मात्र अवघ्या काही दिवसातच हा सिनेमा पायरसीची शिकार ठरला आहे. रोमान्स आणि कॉमेडीनं भरलेला हा सिनेमा रिलीज होताच तमिळ रॉकर्सच्या निशाण्यावर आला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानातर काही तासांतच तमिळ रॉकर्सनी हा सिनेमा लीक केला. इतकंच नाही तर लीक झाल्यानंतर काही वेळातच हा सिनेमा डाउनलोडसाठी काही वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे.

मोतीचूर चकनाचूर या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच समीक्षकांनीही या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. विनोदी धाटणीच्या या सिनेमातील नवाझ आणि अथिया यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मोतीचूर चकनाचूर’ची निर्मिती Viacom 18 मोशन पिक्चर्सनी केली आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन देवमित्र बिस्वाल यांनी केलं आहे. या सिनेमात नवाझुद्दीन आणि अथिया यांच्या व्यतिरिक्त विभा चिब्बर, नवनी परिहार, विवेक मिश्रा, करुणा पांडे, संजीव वत्स, अभिषेक रावत, सपना सॅन्ड आणि उषा नागर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Good Newwz ने उडवली अक्षय-करिनाची झोप, पाहा Trailer

नवाझुद्दीन आणि अथिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. छोट्या गावातील ही कथा रोमँटिक आणि कॉमेडी आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिसऱ्या दिवशी म्हणजे विकेंडला या सिनेमानं 6 कोटी रुपयांची कमाई केली असेल. पण अद्याप या सिनेमानं एकूण किती कमाई केली याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पण आतापर्यंत या सिनेमानं जवळपास 10 कोटींची कमाई केली असल्यांचा अंदाज लावला जात आहे.

'लाल सिंग चढ्ढा'चा First Look रिलीज, मजेदार अंदाजात दिसला आमिर खान

काजोल-अजय 12 वर्षींनी दिसणार एकत्र, ‘तानाजी’मधील तिचा First Look रिलीज

================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 18, 2019, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading