नवाजुद्दीनची 'बेवफा गर्लफ्रेंड' का चिडली?

अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी सुनीता माझं पहिलं प्रेम असल्याचं नवाजने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे. नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, गरिबीमुळे सुनीताने त्याच्याशी ब्रेकअप केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 04:18 PM IST

नवाजुद्दीनची 'बेवफा गर्लफ्रेंड' का चिडली?

30 आॅक्टोबर : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आत्मचरित्राशी संबंधित अनेक किस्से समोर येत आहेत. आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. आता त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळात काम करणारी अभिनेत्री सुनीता राजवरनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने फेसबुकवर मोठी पोस्ट लिहिली आहे, ज्यात तिने नवाजला खोटं ठरवलं आहे. तिने लिहिलंय की नवाजला महिलांचा आदर करता येत नाही.

अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी सुनीता माझं पहिलं प्रेम असल्याचं नवाजने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे. नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, गरिबीमुळे सुनीताने त्याच्याशी ब्रेकअप केला. सुनीता स्वत:च्या अशा गोष्टींवरून चिडली आहे आणि ती नवाज विरोधात तक्रार करण्याचा विचारात आहे.

नवाजुद्दीनने त्याच्या पुस्तकात अनेक नात्यांविषयी मोकळेपणाने लिहिलं आहे. यातच त्याने सुनीताच्या नात्याचाही उल्लेख केला आहे. या पुस्तकात नवाजुद्दीनने दावा केला आहे की त्या दोघांचा ब्रेकअप गरिबीमुळेच झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...