आता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही!

आता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही!

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप चर्चेत आहे. त्यानं आपल्या बायकोची सीडीआर काढली. तेव्हा ही गोष्टही समोर आली की नवाजुद्दीन आपल्या बायकोला वैतागलाय.

  • Share this:

मुंबई, 22 जून : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप चर्चेत आहे. त्यानं आपल्या बायकोची सीडीआर काढली. तेव्हा ही गोष्टही समोर आली की नवाजुद्दीन आपल्या बायकोला वैतागलाय. म्हणूनच त्यानं आपल्या वकील रिझवान सिद्दीकीकडून आपल्या बायकोची सीडीआर काढली होती. ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या तपासात हे समोर आलं होतं. पण आता परिस्थिती पूर्ण बदललीय. नवाज आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही.

हेही वाचा

सावनी शेंडेंना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख ठरली

एका मुलाखतीत नवाजुद्दीननं हे स्पष्ट केलं. तो बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारतोय. त्याचं शूटिंग सुरू आहे. तो म्हणतो, ' बाळासाहेब धाडसी होते. त्यांची भूमिका करताना ते धाडस माझ्यात आलंय. मी माझ्या बायकोला घाबरत नाही. आता मी घरी बायकोशी वरच्या पट्टीत बोलू शकतो.'

23 जानेवारी 2019ला हा सिनेमा रिलीज होईल. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिजीत पानसेनं.

First published: June 22, 2018, 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading