मुंबई, 14 जुलै- बॉलिवूडची(Bollywood) पंगा क्वीन कंगना रनौत (Kangna Ranaut) लवकरच डिजिटल माध्यमातून एक निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. नुकताच तिने ‘मानिकार्निका’ चित्रपटाच्या बॅनरखाली आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ असं या चित्रपटाचं नाव आहे. आत्ता या चित्रपटासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. कंगनाच्या या चित्रपटात आत्ता अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीची (Nawajuddin Sidiqui) एन्ट्री झाली आहे. याबद्दल स्वतः कंगना रनौतने आपल्या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवाजुद्दीनचा एक फोटो शेयर करत म्हटलं आहे ‘टीममध्ये आपलं स्वागत आहे’. त्याचबरोबर मानिकार्निका फिल्म्सच्या एका इन्स्टाग्राम पेजवर लिहिलं आहे, ‘आमच्या टिकू वेड्स शेरूच्या टीममध्ये या पिढीतील एका सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा समावेश झाला आहे’. आम्हाला आमचा वाघ मिळाला आहे, त्यामुळे आम्हाला खुपचं अभिमान वाटतं आहे’. चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वीचं कंगना रनौतने सोशल मीडियावर मानिकार्निका फिल्म्सचा लोगो शेयर केला होता. या लोगोमध्ये डरकाळी फोडणाऱ्या सिंहांचा फोटो आहे. या पोस्टद्वारे कंगनाने आपण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याची माहिती दिली होती.
(हे वाचा:सौरभ गांगुलीवर बनणार बायोपिक; रणबीर कपूर साकारणार दादाची भूमिका? )
‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट लव्ह आणि सटायरवर आधारित आहे. कंगनाने या चित्रपटाद्वारे आपण डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं सांगितलं होतं. तसेच यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचंही म्हटलं होतं. कंगना रनौत आपल्या प्रोडक्शन हाउसमध्ये नवनवीन कलाकरांना संधी देणार आहे. शिवाय ती विविध विषयांवर चित्रपट बनवणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Kangana ranaut