#ThackerayTrailer : 'ही वाघाची औलाद आहे', पहा मराठी ट्रेलर

#ThackerayTrailer : 'ही वाघाची औलाद आहे', पहा मराठी ट्रेलर

ट्रेलरमध्ये बाळासाहेबांचे जुने दिवस, नंतरचा संघर्ष,दंगली सगळ्या गोष्टी दाखवल्यात. यात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखाही दिसते. बाळासाहेबांच्या भाषणांची झलकही यात दिसते. मीनाताईंची भूमिका अमृता राव करतेय.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : बाळासाहेब ठाकरेंवरच्या 'ठाकरे' सिनेमाचा मराठी ट्रेलरही दिमाखात लाँच झाला. सर्वप्रथम हिंदी ट्रेलर लाँच झालं. त्यानंतर मराठीतलं ट्रेलरही लाँच केलं. हा सिनेमा  एकाच वेळी मराठी आणि हिंदीत रिलीज होणार आहे.


काही दिवसांपूर्वी बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा टीझरही मोठ्या दिमाखात लाँच झाला. अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टीझर लाँच झालं होतं. १९९३च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरील 'ठाकरे' सिनेमाचा टीझर  लाँच करण्यात आला होता. या सिनेमातून शिवसेना मनसेची अनोखी युती पाहायला मिळतेय. सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते संजय राऊत करतायत, तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे करत आहेत.23 जानेवारी 2019ला हा सिनेमा रिलीज होईल.


या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीने बरीच मेहनत घेतल्याचं  दिसतंय.  सफेद कुर्त्यामध्ये गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोळ्यांवरील चष्मा, डोक्यावरील केसांची स्टाईल, हातांची लकब हे सर्व काही बाळासाहेबांसारखंच पाहायला मिळतंय. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा कसलेला अभिनेता आहे.ट्रेलरमध्ये बाळासाहेबांचे जुने दिवस, नंतरचा संघर्ष,दंगली सगळ्या गोष्टी दाखवल्यात. यात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखाही दिसते. बाळासाहेबांच्या भाषणांची झलकही यात दिसते. मीनाताईंची भूमिका अमृता राव करतेय.


नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत आहे, हे तर सगळ्यांनाच माहितीये.अभिजीत पानसे दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग मागेच संपलं.  काही दिवसांपूर्वी नवाजने या सिनेमाच्या डबिंगला सुरुवात केली होती.काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चक्क मराठीत 'माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो...आजपासून डबिंगची सुरूवात केलीय,' अशी पोस्ट टाकली होती. त्याची ही पोस्ट वाचून बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.


#ThackerayTrailer: बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 05:46 PM IST

ताज्या बातम्या