धर्मावर बोलबच्चन करणाऱ्यांना नवाजुद्दीनची अशीही चपराक

धर्मावर बोलबच्चन करणाऱ्यांना नवाजुद्दीनची अशीही चपराक

आपल्या सिनेमाबद्दलचं शेअर करताना नवाजुद्दीननं सामाजिक संदेशही शेअर केलाय.

  • Share this:

24 एप्रिल : नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या चर्चेत आहे तो मंटो सिनेमामुळे. पण इतकंच नाही, सध्या हा गुणी अभिनेता सोशल मीडियावरही कार्यरत आहेत. आपल्या सिनेमाबद्दलचं शेअर करताना त्यानं सामाजिक संदेशही शेअर केलाय.

नवाजनं एक व्हिडिओ शेअर केलाय.  त्याच्या हातात प्लेकार्ड आहे. त्यानं म्हटलंय, ' मी डीएनए टेस्ट केलं. त्यातून मला कळलं की माझा संबंध 16.66 टक्के हिंदू, मुस्लीम,शीख, ख्रिशन, बौध्द आणि इतर धर्मांशी आहे. पण मी स्वत:च्या मनाला विचारलं, तेव्हा कळलं मी 100 टक्के फक्त आणि फक्त कलाकार आहे.'

नवाजनं हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका तासाच्या आत कमीत कमी 3 हजार लोकांनी  तो शेअर केला आणि 92 हजारापेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला.

First published: April 24, 2017, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading