S M L

नवाझुद्दीन सिद्दीकीचा पुस्तक मागे घेण्याचा निर्णय

यामुळे कुणी दुखावलं असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि माझं पुस्तक मागे घेतो असं ट्विट नवाझने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 31, 2017 04:20 PM IST

नवाझुद्दीन सिद्दीकीचा पुस्तक मागे घेण्याचा निर्णय

31 आॅक्टोबर : नवाझुद्दीन सिद्दीकीच्या 'अॅन ऑर्डिनरी लाईफ- ए मेमॉयर' हे पुस्तक वादात अडकल्यामुळे ते मागे घेण्याचा निर्णय नवाझने घेतलाय. या पुस्तकाद्वारे कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, तरीही यामुळे कुणी दुखावलं असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि माझं पुस्तक मागे घेतो असं ट्विट नवाझने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलंय.

Loading...
Loading...

नवाझने त्यांच्या पुस्तकातून आपल्या एक्स गर्लफ्रेंड निहारिका सिंग आणि सुनीता राजवार यांच्याबद्दल प्रकरणं लिहिली होती. मात्र या प्रकरणांचा नेमका उलटा परिणाम झाला.निहारिकाने नवाझने पुस्तक खपवण्यासाठी खाजगी आयुष्यातील संदर्भ वापरल्याचा आरोप केला. तर सुनीताने नवाझला सोडण्यामागचं खरं कारणच सोशल मीडियावर शेअर करून त्याच्यावर महिलांचा अनादर केल्याचा आरोप केला.

पुस्तकामुळे आपल्या अडचणी वाढत असल्याचं पाहून नवाझने हे पुस्तक  मागे घ्यायचं ठरवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 04:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close