नवाजुद्दीनवर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडनं ठोकला 2 कोटींचा दावा

नवाजुद्दीनवर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडनं ठोकला 2 कोटींचा दावा

सुनीताने नवाजवर 2 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. या पुस्तकात आपल्याबद्दल लिहिलेल्या गोष्टींमुळे आपली नाहक बदनामी झालेली असून त्याबद्दल नवाजने आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी तिने केलीय.

  • Share this:

13 नोव्हेंबर : नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचं आत्मचरित्र असलेल्या अॅन आर्डिनरी लाईफमध्ये आपली पहिली गर्लफ्रेंड सुनीता राजवर हिच्यावर लिहिलेलं प्रकरण त्याला चांगलंच अंगलट येणार असं दिसतंय. कारण सुनीताने नवाजवर 2 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. या पुस्तकात आपल्याबद्दल लिहिलेल्या गोष्टींमुळे आपली नाहक बदनामी झालेली असून त्याबद्दल नवाजने आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी तिने केलीय.

याला अद्याप नवाजने उत्तर दिलेलं नसलं तरीही हे पुस्तक मागे घेऊनही त्याबद्दलचे वाद शमण्याचं नाव घेत नाहीत हेच खरं.

अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी सुनीता माझं पहिलं प्रेम असल्याचं नवाजने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे. नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, गरिबीमुळे सुनीताने त्याच्याशी ब्रेकअप केला. सुनीता स्वत:च्या अशा गोष्टींवरून चिडली आहे.

नवाजुद्दीनने त्याच्या पुस्तकात अनेक नात्यांविषयी मोकळेपणाने लिहिलं आहे. यातच त्याने सुनीताच्या नात्याचाही उल्लेख केला आहे. या पुस्तकात नवाजुद्दीनने दावा केला आहे की त्या दोघांचा ब्रेकअप गरिबीमुळेच झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...