नवाब शहाने कुटुंबासमोरच पूजा बत्राला असं केलं प्रपोज, म्हणाला...

नवाब शहाने कुटुंबासमोरच पूजा बत्राला असं केलं प्रपोज, म्हणाला...

जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तो किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे, तेव्हा एकत्र आयुष्य जगण्याची मजा काही औरच असते.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै- अभिनेत्री पूजा बत्रा आणि नवाब शहा यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गुपचूप लग्न केलं. पूजा आणि नवाब यांनी अचानक लग्न केल्यामुळे बी-टाउनमध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता नवाबने त्याच्या लग्नाबद्दल आणि पूजाबद्दल मेन्सएक्सपीकडे दिलखुलास गप्पा मारल्या.

यावेळी नवाब म्हणाला की, ‘मी माझ्या घरच्यांसमोरच पूजाला लग्नाची मागणी घातली. हे काही ठरवून केलं नव्हतं, सहज झालं. आम्ही दोघंही तेव्हा फार आनंदी होतो. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तो किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे, तेव्हा एकत्र आयुष्य जगण्याची मजा काही औरच असते. मी तिला नेहमी सांगत असतो की, आपल्या दोघांना एकत्र मोठं व्हायचं आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याला मुलं आहेत. आपल्याला फिरायचं आहे. आम्हा दोघांना लिहायला आणि वाचायला आवडतं. आम्ही नेहमी म्हणतो की, ‘आयुष्य लहान आहे’ मग ते मनमुराद का जगू नये.’

 

View this post on Instagram

 

Life Union ❤️ !! Thank you for all the love and good wishes!! Love and light

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

नवाब म्हणाला की, त्याने जेव्हा पहिल्यांदा पूजाला एअरपोर्टवर पाहिले तेव्हाच त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. प्रेमाबद्दल बोलताना नवाब म्हणाला की, ‘हे अगदी सहज झालं. ती सात समुंदर पार लॉस एंजेलिसला होती. आम्ही 20 वर्षांपूर्वी एकमेकांना ओळखत होतो. पण गोष्टी अचानक अशा बदलल्या की आम्हालाच कळलं. पहिल्यांदा आम्ही लॉस एंजेलिसच्या एअरपोर्टवर भेटलो. एवढ्या वर्षांमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटत होतो.’

 

View this post on Instagram

 

Love and light ❤️

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

नवाब शहा लवकरच आशुतोष गोवारीकरच्या 'पानीपत' सिनेमत दिसणार आहे. इब्राहिम खान गर्दी ही व्यक्तिरेखा तो सिनेमात साकारणार आहे. याशिवाय तो 'मुन्ना बदनाम हुआ' आणि 'दबंग 3' मध्ये दिसणार आहे. पूजाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने सर्जन सोनू अहलुवालियाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघं वेगळे झाले. 2011 मध्ये पूजाने घटस्फोट घेतला. 1993 मध्ये तिने मिस इंडिया- पेसिफिक हा किताब जिंकला होता.

 

View this post on Instagram

 

lady thinks like a boss ❤️

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला निकने शेअर केला 'देसी गर्ल'चा फोटो

83 Video- रणवीरसोबत प्रॅक्टिस करताना लेकानेच मोडली संदीप पाटील यांची बॅट

Kulbhushan Jadhav यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त ट्वीट

'या' सहा अभिनेत्री ज्यांचे सेक्स सीन झाले होते लीक

SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 02:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading