मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : विशाखा सुभेदारचा Navratri Special 'जोगवा' पाहिला का?

VIDEO : विशाखा सुभेदारचा Navratri Special 'जोगवा' पाहिला का?

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विशाखा सुभेदारने (vishakha subhedar) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विशाखा सुभेदारने (vishakha subhedar) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विशाखा सुभेदारने (vishakha subhedar) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  मुंबई. 09 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सवाला ( Navratri 2021) सुरुवात झाली आहे. याच उत्सवाचे औचित्यसाधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री 9 दिवस विविध देवींची रुप धारण करत हटके फोटोशुट करत असतात. सोशल मिडीयावर नवरात्रीत हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यासोबतच मनोरंजन विश्वातील काही कलाकार मंडळी यानिमित्त विविध कला सादर करताना दिसत आहेत. अभिनेत्री रूपाली भोसले तसचे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने देखील या नऊ दिवस देवीची नऊ रुपे धारण करुन केलेले फोटोशूट सध्या चर्चेत आहे. यासोबतच अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील गरबा डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेयर केला होता. सध्या सोशल मीडियावर विशाखा सुभेदार (vishakha subhedar) हिचा एक व्हिडिओ सर्वांचे (jogwa) लक्ष वेधून घेत आहे. विशाखा सुभेदारने जोगवा डान्स करत त्यांची कला सादर केली आहे. विशाखाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हा खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. सगळ्यांनी विशाखाचे यासाठी कौतुक केले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Latika Shriyan (@latsdances)

  विशाखा सुभेदारने महाराष्ट्रातील जोगवा ही पारंपारिक नृत्यकला सादर केली आहे. विशाखाच्या सोबतीला नृत्यदिग्दर्शिका लतिका देखील दिसत आहे. विशाखाला अभिनयासह नृत्यकौशल्यही अवगत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तिने सादर केलेलं नृत्यही आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिची नृत्यकला पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत व तिचे कौतुक देखील करत आहेत. वाचा : Navratri 2021: तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरी रुपात सजली ही अभिनेत्री; पाहा ओळखू येतेय का स्टॅण्ड अप कॉमेडी करणा-या मराठी कलाकारांपैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. 'फु बाई फु', ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोजमधून विशाखाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. सध्या विशाखा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसते. वाचा : Bigg Boss Marathi 3 च्या घरात मराठीतील 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री  22 मार्च 1976 रोजी जन्मलेल्या विशाखाचे लग्न अभिनेते महेश सुभेदार यांच्यासोबत झाले आहे. विशाखाचे माहेरचे आडनाव शिंदे आहे. विशाखा मुळची ठाण्याची आहे. कळवा येथे तिचे माहेर आहेव तेथूनच तिने शिक्षण पूर्ण केले आहे. 1998 मध्ये अभिनेते आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखाचे लग्न झाले. महेश सुभेदार हे इंजिनिअरसुद्धा आहेत. महेश आणि विशाखाला एक मुलगा असून अभिनय हे त्याचे नाव आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Navratri, TV serials

  पुढील बातम्या