अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगताना दिसत आहे. तिने या सात दिवसात विविध देवींचे रूप धारण करत फोटोशूट केले आहे. तिच्या या कल्पनेला चाहत्यांची देखील पसंती मिळत आहे. यासाठी ती प्रत्येकवेळी न चुकात तिच्या टीमचे देखील कौतुक करत असते.View this post on Instagram
पहिल्या दिवशी अपूर्वाने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप केले धारण शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते. वाचा : आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही दुधी ठरला जीवघेणा; कसा ओळखायचा विषारी दुधी भोपळा? दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप केले धारण दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले होते. तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धरण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले होते.चौथ्या दिवशी अपूर्वाने जगदंबा मातेच्या रुपात पाहायला मिळली. तिसऱ्या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे. चौथ्या दिवशी अपूर्वाने जगदंबा मातेचे रूप धारण केले अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जगदंबा मातेचे रूप धारण केले होते.जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर,अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराच बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराच खास वैशिष्टय़ असल्याची माहिती देखील तिने दिली होती. वाचा : साडी काय ऋतुने गिफ्ट दिली का ?; सायली संजीवच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट पाचव्या दिवशी अपूर्वाने अपूर्वाने बंगाली देवीचे रुप केले धारण नवरात्रीचा पाचव्या दिवशी अपूर्वाने बंगाली देवीचे रुप धारण केले होते. 'बंगाली देवी त्रिनयन दुर्गामाता, त्रिपूरा अगरतला'' अशी कॅप्शन देत तिने देवीच्या रुपातील काही फोटो शेअर केले होते. अपूर्वाची ही कल्पना सर्वांना आवडलेली आहे. चाहते देखील तिच्या या कल्पनेचे कौतुक करत आहे. व ती उद्या कोणत्या देवीच्या रूपात दिसणार याची वाट पाहत असतात. साहाव्या दिवशी अपूर्वाने एकवीरा देवीचे रुप केले धारण नवरात्रीच्या साहाव्या दिवशी अपूर्वाने एकवीरा देवीचे रुप धारण केले होते व काही देवीच्या रूपातील तिचे फोटो शेअर केले होते. तिने इन्स्टा पोस्ट करत म्हटले होते की,लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Navratri, TV serials